BANNER

The Janshakti News

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात काम करणे गरजेचे.... कैलास कोडग

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात काम करणे गरजेचे....
                   कैलास कोडग....

-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------

भिलवडी |  दि.08 / 03 / 2022

      भिलवडी ता.पलूस येथे भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी महिला पोलीस पाटील व महिला पोलीस कर्मचारी यांचा बुके व केक कापून  सन्मान केला. 
     यावेळी चोपडेवाडी गावच्या पोलीस पाटील रेखा यादव ,सुखवाडीच्या पोलीस पाटील अमृता जगताप, अंकलखोप पोलीस पाटील उर्मिला सूर्यवंशी ,माधवी साळुंखे, माधुरी जाधव,ग्रामपंचायत सदस्या स्वप्नाली रांजणे,विद्या पाटील, महिला पोलीस कर्मचारी पूजा दिवटे ,पद्मावती पोतदार ,सारिका मदने ह्या महिलांचा सत्कार केला.


     यावेळी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक म्हणाले आजच्या युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणे गरजेचे आहे आज महिला जर कुटुंब सांभाळत असतील तर शासकीय सेवा,  देशसेवा ,किंवा एखादा व्यवसाय असुद्या हे सर्व करण्यासाठी त्या कुठेही मागे पडणार नाहीत एका पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असल्याशिवाय पुरुष उभा राहू शकत नाही असे म्हटले जाते तर स्वतः महिला सक्षम असून सुद्धा पाठीमागे का राहतात त्यामुळे महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणे गरजेचे आहे,आई एक महिला असून जर आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊन घडवत असेल तर महिला एक दिवस देश घडवतील  कैलास कोडग यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या .महिलांनी प्रत्येक क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे असे आवाहन केले .◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆