भारती विद्यापीठाचे,पद्म.वसंतरावदादा पाटील विद्यालय,खंडोबाचीवाडी व ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी यांचे संयुक्त विद्यमाने बक्षिस वितरण समारंभ व महिला दिन उत्साहात साजरा....
--------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------
भिलवडी | ता. १३ / ०३ / २०२२
भारती विद्यापीठाचे,पदमभूषण वसंतरावदादा पाटील विद्यालय,खंडोबाचीवाडी तसेच ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी ता.पलूस जि.सांगली यांचे संयुक्त विद्यमाने
"माझी वसुंधरा" अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा व महिला दिन समारंभ मंगळवार दिनांक 08/03/2022 रोजी आयोजित करण्यात आला होता.यावेळी खंडोबाचीवाडी गावचे सरपंच श्री.धनंजय गायकवाड,ग्रामसेविका सौ.बाबर मॅडम,ग्रामपंचायत सदस्य श्री.उत्तम जाधव ,श्री.प्रताप शिंदे,सौ.माधवी मगदूम,प्रतिष्ठित नागरिक,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.शिंदे एस.बी.व मान्यवर उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी,चित्रकला,घोषवाक्य,निबंध या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय ग्रामपंचायत सदस्य श्री.उत्तम मारुती जाधव यांनी आपल्या वडिलांच्या कै.मारुती आकाराम जाधव यांच्या स्मरणार्थ "वैयक्तिक गीतगायन स्पर्धेतील" यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम स्वरूपात स्वतःच्या वतीने बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले.
या समारंभाचे प्रास्ताविक श्री.धुमाळ सर यांनी केले.महिला दिनानिमित्त आपल्या मनोगतातून प्रशालेतील कु.स्मिता जाधव या विद्यार्थिनीने तर शिक्षकांमधून श्री.महाजन सर यांनी शुभेच्छा देताना महिलांचे योगदान स्पष्ट केले.
सरपंच श्री.धनंजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचा गौरव करताना विशेष आनंद होत असल्याचे सांगितले व भावी काळातील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.शिंदे सर यांनी आपल्या मनोगतात ग्रामपंचायत करत असलेल्या उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्याबद्दल उल्लेख करताना ग्रामपंचायतीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच महिला दिनानिमित्त उपस्थित महिला मान्यवर ,सर्व विद्यार्थिनी व महिला पालकांना शुभेच्छा दिल्या.
या समारंभाचे सूत्रसंचलन श्री.मुल्ला सर यांनी केले तर आभार श्री.देसाई सर यांनी मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆