BANNER

The Janshakti News

पलूस तालुका संगणकपरिचालक संघटनेच्या अध्यक्ष पदी आण्णासो गावडे यांची निवड...पलूस तालुका संगणकपरिचालक संघटनेच्या अध्यक्ष पदी आण्णासो गावडे यांची निवड... 

======================================
======================================

भिलवडी | दि.२०/०२/२०२२

 पलूस येथे तालुका संगणक परिचालक  संघटनेची नूतन कार्यकारणी निवड सांगली जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अनिकेत यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर  करण्यात आली.


 या बैठकीत नवीन कार्यकारणीमध्ये अध्यक्ष –आण्णासो गावडे (ब्रम्हनाळ),उपाध्यक्ष अमरसिंह पाटील (घोगाव) कार्याध्यक्ष –योगेश गडदे (अंकलखोप),सचिव सौ.अंकिता ढेरे (बुरुंगवाडी) सोशल मिडिया  विस्तार –वैभव माने .नूतन सदस्य- श्रीदेवी सावंत (वसगडे),शीतल सुतार (सांडगेवाडी) ,राजुल पाटील (दह्यारी) महेश घाडगे(विठ्ठलवाडी)अमर उंबरे(खोलेवाडी) निवड करण्यात आली. 


यावेळी संगणक परिचालकांचे थकीत मानधन व अन्य समस्यांबाबत काम बंदचे लेखी निवेदन मा.स्मिता पाटील (गटविकास अधिकारीसो ,पंचायत समिती पलूस )यांना देण्यात आले  त्यावेळी मा.पाटील मँडम यांनी संगणक परिचालक यांच्या व्यथा समजून घेऊन थकीत मानधन लवकर व्हावेत यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त करण्याचे आश्वासन दिले 
यावेळी पलूस तालुका संगणक परिचालक संघटनेचे सर्व नूतन कार्यकारणी सांगली जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अनिकेत यादव ,जिल्हा संघटनेचे सदस्य सागर चव्हाण,संग्राम यादव  उपस्थित होते.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
◆◆◆◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆