BANNER

The Janshakti News

चितळे महाविद्यालयातील विश्वजित गावडे इतिहास विषयात विद्यापीठामध्ये प्रथम....चितळे महाविद्यालयातील विश्वजित गावडे इतिहास विषयात विद्यापीठामध्ये प्रथम....


-------------------------------------------------------------------
         सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
--------------------------------------------------------------------

भिलवडी दि.१७/०१/२०२२

भिलवडी तालुका पलुस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या इतिहास विभागामध्ये  शिकत असलेला विद्यार्थी विश्वजीत तानाजी गावडे हा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर च्या मार्च २० २१ या परीक्षेत बी.ए. भाग - ३ इतिहास विषयामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळाला आहे . 
या निमित् संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे यांनी त्याचा शाल , श्रीफळ ,  फेटा व ग्रंथ भेट देवून सत्कार केला. यावेळी संस्थेचे संचालक मा. गिरीश चितळे , मा. डी.के . किणीकर ' मा. संजय कदम ' मा. डी.ए . चौगुले . सचिव ' मा. मानसिंग हाके , सहसचिव मा. के.डी.पाटील विश्वस्त मा. जे.बी. चौगुले सर प्राचार्य डॉ . डी.जी. देशपांडे इतिहासाचे सहाय्यक  प्रा. केंगार ए.एन. उपस्थित होते.


       या वेळी संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे म्हणाले की शिवाजी विद्यापीठामध्ये आपल्या महाविद्यालयातील विदयार्थी बी.ए. भाग - ३ इतिहास विषयात सर्वप्रथम येणे हे आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे . यामुळे आमच्या महाविद्यालयाचा नावलौकीक वाढणार आहे . या विद्यार्थ्यासारखे अनेक विद्यार्थी घडावेत ही अपेक्षा आहे. या विद्यार्थ्याला सर्वातोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले . या विद्यार्थ्याने आय .पी .एस . आय.ए.एस. अशा उच्च पदस्य पदांचा अभ्यास करून यशस्वी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली .
          यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी केले . सूत्रसंचालन डॉ. सुरेश शिंदे यांनी केले तर आभार इतिहासाचे  प्राध्यापक प्रा. केंगार ए.एन. यांनी केले . यावेळी महाविद्यालयातील कला , विज्ञान व वाणिज्य विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते .

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆