छ. शिवाजी महाराजांची बंगलोर (कर्नाटक) मध्ये झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ भिलवडीत शिवप्रेमींचा भव्य मोर्चा....
भिलवडी येथील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केला दुग्धाअभिषेक...
--------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. २० डिसेंबर २०२१
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची बेंगलोर येथे विटंबना करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. ज्या बेंगलोरला छत्रपती शहाजीराजांनी मोठे केले त्याच बेंगलोर मध्ये शिवरायांची बदनामी होणार हे क्लेशदायक आहे. या घटनेतील समाजकंटकांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना ही छोटी घटना असे म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचाही भिलवडी तालुका पलूस येथील शिवप्रेमींनी निषेध केला.
छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची अस्मिता आहे. त्यामुळे या घटनेची महाराष्ट्र सरकारने सखोल चौकशी करुन पुतळा विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भिलवडी येथील शिवप्रेमींनी या निवेदनाद्वारे केली आहे.
सदरचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी भिलवडी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य व गावातील नेते मंडळी यांच्याकडे देण्यात देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्या समज कंटकावरती तात्काळ कारवाई व्हावी या मागणीसाठी व ही घटना छोटी म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी भिलवडी व परिसरातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी या मोर्चामध्ये सामील झाले होते.
--------------------------------------------------------------------