भिलवडी व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सुबोध वाळवेकर यांची निवड...
-------------------------------------------------------
दि.०९/१२/२०२१
भिलवडी व्यापारी संघटनेची सर्वसाधारण सभा आज बुधवार दि ८ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. महापुराच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली मीटिंग वादळी होण्याची शक्यता असल्याने मोठ्याप्रमाणात व्यापारी वर्गाने उपस्थिती लावली होती.
व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या मीटिंग मध्ये वर्तमान संचालक मंडळ बरखास्त करण्याचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. तसेच नवीन संचालक मंडळाची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी सुबोध वाळवेकर यांची तसेच उपाध्यक्षपदी रणजित पाटील व इम्रान उर्फ लालूभाई जमादार यांची आवाजी मतदानाने निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी राजेंद्र तेली यांची निवड झाली.
याप्रसंगी व्यापारी संघटनेचे विश्वस्त जावेद तांबोळी, गजानन चौगुले, दिलीप कोरे, विलास सूर्यवंशी तसेच मोठ्याप्रमाणात व्यापारीवर्ग उपस्थित होता.