BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न...



भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न...



भिलवडी | दि.08/12/2021

 भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके,सहसचिव के. डी.पाटील यांच्या हस्ते व भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी. के.किणीकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यार्थ्यांनी बालवयापासून पुस्तकांशी मैत्री करावी,वाचन,चिंतन,मनन करावे यामधून गुणवत्ता वाढेल असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे मानसिंग हाके यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना डी.के.किणीकर म्हणाले की,विद्यार्थ्यांनी कोरोनाचे  नियम पाळून चागली प्रतिकारशक्ती तयार करावी.स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत अभ्यासावर ही लक्ष केंद्रित करावे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


यावेळी सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातील परीक्षा व विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी प्रास्ताविक केले.संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सौ. छाया गायकवाड यांनी आभार मानले.

यावेळी बालवाडी व प्राथमिक विभागप्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील, बालवाडीच्या मुख्याध्यापिका सुचेता कुलकर्णी,सौ.संध्याराणी भिंगारदिवे,सौ.प्रगती भोसले,आदीसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मानसिंग हाके,
डी.के.किणीकर,के.डी.पाटील, प्रा.मनिषा पाटील,सुकुमार किणीकर आदी.