BANNER

The Janshakti News

फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचकडून हुमायून नदाफ यांना "युवा पत्रकारिता"- समाज जागृती पुरस्कार २०२१ जाहीर...



फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचकडून हुमायून नदाफ यांना "युवा पत्रकारिता"- समाज जागृती पुरस्कार २०२१  जाहीर...
   
 शिरोळ | दि. 5/12/2021

 टाकवडे ता. शिरोळ येथील फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या मान्यवरांना सन २०२१ यावर्षीचे १६ वे "समाजजागृती पुरस्कार" नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.                                    
    राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन शाखा हुपरीचे सक्रेटरी युवा पत्रकार  हुमायून नदाफ   यांच्या नावाचा     "युवा पत्रकारिता"  समाज जागृती पुरस्कार (२०२१) साठी  समावेश करण्यात आला आहे.                                              
 सदर पुरस्कार वितरण समारंभ मा.डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर- आरोग्य व सांस्कृतिक राज्यमंत्री यांचे हस्ते व मा. प्रकाश पाटील,टाकवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच संपन्न होणार आहे तसेच पंचायत समिती माजी सभापती व विद्यमान सदस्या अर्चना चौगुले व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विचारमंचे कार्याध्यक्ष आकाश कांबळे, अशोक कांबळे, रमेश कांबळे, संस्थापक राजेंद्र कांबळे (पत्रकार) यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे.