BANNER

The Janshakti News

" द. जनशक्ती न्यूज " च्या दणक्यामुळे... भिलवडी-साखरवाडी येथील नागरिकांच्या मागणीला अखेर आले यश....

         ......द जनशक्ती न्यूज - इम्पॅक्ट.....

" द. जनशक्ती न्यूज " च्या दणक्यामुळे... 

भिलवडी-साखरवाडी येथील नागरिकांच्या मागणीला अखेर आले यश....--------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
----------------------------------------------------------------------

भिलवडी | दि. 26 डिसेंबर 2021

भिलवडी :  साखरवाडी येथील लोकवस्तीतील  अनेक लोकांच्या घरावरून विद्युत वाहक तारा गेल्याने नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदर  भागातील घरांवरील धोकादायक विद्युत वाहक तारा काढून त्याचे योग्य ते नियोजन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून येथील नागरिक करीत होते. परंतु या गंभीर बाबीकडे विद्युत महावितरण शाखा भिलवडी जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करित होते. अखेर सदर भागातील नागरिकांनी " द.जनशक्ती न्यूज " डिजिटल मिडिया चैनलशी संपर्क केला व तात्काळ याबाबतच्या सत्यतेची पडथाळणी करुन लोकहिताच्या दृष्टीने  15 डिसेंबर रोजी आमच्या " द. जनशक्ती न्यूज " च्या माध्यमातून हि बातमी प्रसारित करण्यात आली  होती. आमच्या बातमीची तात्काळ दखल घेऊन विद्युत महावितरणच्या पदाधिकाऱ्यांनी कायदेशीर पाठपुरावा करीत, याबाबतचे योग्य ते नियोजन करून संबंधित घरावरील तारा तातडीने काढून घेऊन दुसऱ्या खांबावरून ओढल्या आहेत. संबधित घरावरील विद्युत वाहक तारा काढल्यामुळे येथील लोकांचे जीवन सुरक्षित बनले आहे.
विद्युत महावितरण शाखा भिलवडी साय्यक अभियंता उज्वला सदाकळे (बडेकर) मॅडम व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांचे साखरवाडी येथील नागरिकांनी आभार मानले आहेत.त्याचबरोबर
संबधित भागातील नागरिकांच्या घरावरुन गेलेल्या विद्युत वाहक तारेमुळे या भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू नये यासाठी संबंधित विभागाकडे  भिलवडी ग्रामपंचायत प्रशासन विशेषतः भिलवडी गावचे जेष्ठ नेते संग्राम (दादा) पाटील , उपसरपंच पृथ्वीराज पाटील , सदर भागातील सामाजिक कार्यकर्ते अबुबखर फकिर यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे व ''द.जनशक्ती न्यूज" ने बातमी प्रसारित केल्यामुळे या भागातील नागरिकांच्या मागणीला अखेर यश आले आहे. त्यामुळे  साखरवाडी येथील नागरिकांनी सर्वांचे मनस्वी आभार मानले आहेत.


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

........................... ..............................................