BANNER

The Janshakti News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अंकलखोप येथील स्मृती स्थळी बहुतांश भिम अनुयायांनी केले अभिवादन...





डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अंकलखोप येथील स्मृती स्थळी बहुतांश भिम अनुयायांनी केले अभिवादन...


               👇   LIVE VIDEO 👇



भिलवडी | दि. ६ डिसेंबर २०२१

प्रज्ञासुर्य, बोधीसत्व विद्वत्तेचा महामेरू परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महाप
रिनिर्वाण दिना निमित्त, स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार , विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अंकलखोप, भिलवडीसह परिसरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांनी अभिवादन केले. बहुतांश भिम अनुयायांनी कोरोना बाबतच्या शासन नियमांचे पालन करुन अभिवादन केले.



अंकलखोप ता. पलूस या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी अंकलखोप येथे असल्याने सांगली जिल्हयासह बाहेर गावाहून हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अंकलखोप येथे येतात.परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत भिम अनुयायांनी सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देत, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशिला ग्रहण करून साध्या पध्दतीने अभिवादन करणे पसंत केले.


६ डिसेंबर १९५६ हा तमाम दलीत, अस्पृश्यांबरोबरच सर्व भारतीयांच्या जीवनातील एक दुःखद दिवस, कारण या दिवशी, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या, प्रतिकुल परिस्थितीमध्ये विविध पदव्यांसह उच्च शिक्षण घेवून आपल्या समाज बांधवांना शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असा अनमोल मंत्र देणारे, तसेच आपल्या शिक्षणाच्या अनुभवातून लेखणीच्या सहाय्याने भारताच्या संस्कृतीची विविधतेतून एकता प्रस्थापित करण्यासाठी, समता, न्याय, बंधूता याची एकसंघ पणे मांडणी करून, सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क देवून रंकाचा राव करणाऱ्या तसेच अखंड विश्वात आदर्श अशी भारतीय राज्यघटना लिहून, लोकशाहीचे राज्य प्रस्थापित करणारे, तसेच जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुध्दांचा अहिंसावादी धम्म स्विकारुन, सोशीत, पिडीत जनतेला धम्मरुपी नवसंजीवनी देणारे दलितांचे कैवारी, विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाले.




यावेळी बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी मुंबई येथे दाखल झाले होते. रक्षा विसर्जना वेळी कडक पोलिस बंदोबस्त व समता सैनिकांना चकवा देत, जिवाची पर्वा न करता अंकलखोप ता. पलूस येथील यशवंत दादू लांडगे, गणपत महादू लांडगे, रामचंद्र मारूती लांडगे व लुमा लखू लांडगे यांनी बाबासाहेबांच्या अस्थी अंकलखोप गावी आणून, तत्पूर्वी बाबासाहेब अंकलखोप गावी सभेच्या निमित्ताने आले तेंव्हा ज्या ठिकाणी पहिले पाऊल टाकले त्या ठिकाणी त्यांच्या अस्थीचे जतन करून स्मृती स्थळ बनविले.




मुंबई येथील चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंकलखोपची मिनी चैत्यभूमी समजल्या जाणाऱ्या बाबासाहेबांच्या या स्मृती स्थळी अभिवादन करण्यासाठी सांगली जिल्हयासह इतर भागातून आलेल्या भिम अनुयायांनी अंकलखोप येथील बाबासाहेबांच्या स्मृती स्थळी उपस्थित राहून परमपूज्य बोध्दिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
भिलवडी येथील पंचशिल नगरमधील महिलांसह लहानथोर अनुयायांनी , त्रिसरणपंचशिला ग्रहण करुन बाबासाहेबांना अभिवादन केले. दरम्यान भिलवडी येथील पंचशिल नगर येथील बुध्द विहारामध्ये बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून, त्रिसरण पंचशिला ग्रहण करून अभिवादन करण्यात आले.




यावेळी प्रज्ञासुर्य, बोधीसत्व विद्वत्तेचा महामेरू परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त, स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार , विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकारी व विविध भागातून आलेले भिम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.