BANNER

The Janshakti News

प्राथमिक शिक्षक बँकेसाठी शिक्षक परिषदेच्या वतीने संतोष जाधव यांची उमेदवारी जाहीर...

प्राथमिक शिक्षक बँकेसाठी शिक्षक परिषदेच्या वतीने संतोष जाधव यांची उमेदवारी जाहीर...

सांगली | दि. 28/11/2021

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी   महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद मैदानात उतरणार असून परिषदेने संतोष सीताराम  जाधव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आदर्श शिक्षण मंदिर किल्ला भाग मिरज येथे  माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांच्या उपस्थित आयोजित बैठकीत जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कटारे यांनी  संतोष सिताराम जाधव मिरज यांना सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. सांगली या बँकेच्या निवडणूकीसाठी शिक्षक परिषद या संघटनेच्या वतीने अधिकृत उमेदवारी जाहिर केली आहे.
बँक निवडणुकीसाठी शिक्षक संघाच्या संभाजीराव थोरात गटा सोबत शिक्षक परिषदेने युती केली असून बँकेच्या एकूण २१ जागा पैकी एका जागेवर शिक्षक परिषद निवडणूक लढवणार आहे.संघाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे यांच्यासह सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी ,सभासद यांनी एकत्र येऊन या उमेदवारीस पाठिंबा दिला आहे.संतोष जाधव यांच्या 
 सांगली जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकामध्ये या उमेदवारी मुळे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. शिक्षक संघ संभाजीराव थोरात गटाबरोबर युती केल्याने संतोष जाधव यांचा विजय निश्चित मानला जातो. सांगली जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांच्या एकमुखी पाठिंबा असलेले संतोष जाधव बँकेचे प्रतिनिधीत्व करणार असून त्यामुळे खाजगी शाळेतील शिक्षकांना बँकेच्या सर्व योजनांचा फायदा होईल हे मात्र नक्की आहे.
यावेळी चंद्रकांत चव्हाण,राजाराम व्हनखंडे,अरविंद पाटील,उदयसिंह भोसले,रामराव पाटील,दिपक संकपाळ,बाळासाहेब बुरुटे, संगिता पाटील,अनुजा जगदाळे,अनघा पोंक्षे,प्रवीण,खोत,अनिल उमराणी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


संतोष जाधव यांना शुभेच्छा देताना भगवानराव साळुंखे,बाळासाहेब कटारे,राजाराम व्हनखंडे,चंद्रकांत चव्हाण,आदींसह पदाधिकारी..