BANNER

The Janshakti News

भिलवडी स्टेशन येथील गोसावी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मा.जालिंदर जाधव यांची अखिल भारतीय भटके गोसावी समाज संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष पदी निवड...भिलवडी स्टेशन  येथील गोसावी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मा.जालिंदर जाधव यांची अखिल भारतीय भटके गोसावी समाज संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष पदी निवड... 

भिलवडी | दि.13/11/2021

भिलवडी स्टेशन तालुका पलूस येथील गोसावी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मा.जालिंदर जाधव यांची अखिल भारतीय भटके गोसावी समाज संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
    आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हि भावना मनामध्ये बाळगून गेल्या अनेक वर्षांपासून जालिंदर जाधव यांनी सर्व सामान्य लोकांची प्रामाणिक व निस्वार्थी भावनेने सेवा केली आहे. सामाजिक कार्याबरोबरच राजकारणात तसेच शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात देखील त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. 
जालिंदर जाधव यांनी  सोशीत , पिडीत ,वंचित घटकातील गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देणे ,गोरगरीब लोकांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचारा विरोधात निर्भिडपणे लढणे असे अनेक सामाजिक कामे त्यांनी केली आहेत.
त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन 

मा.शिवाजी गोसावी सर
  राष्ट्रीय प्रवक्ते (बुधगाव)

मा.संजय चव्हाण
    राष्ट्रीय अध्यक्ष (पुणे)

मा.आप्पासाहेब जाधव सर
    राष्ट्रीय कार्याध्यक्ष (जुळेवाडी)

मा.लालासो चव्हाण सर
     राष्ट्रीय सरचिटणीस (पलूस)

मा.संतोष मोरे सर
    राष्ट्रीय खजिनदार (भिलवडी)

     आणि आमचे सहकारी 
मा.जयकर बापू जाधव 
     भिलवडी चे सामाजिक कार्यकर्ते
 यांच्या सहकार्याने

अखिल भारतीय भटके गोसावी समाज संघटनेचे मा.रोहिदास आप्पा घाडगे
      महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी  मा.जालिंदर जाधव यांना सांगली जिल्हा अध्यक्ष पदाचे  निवड पत्र देऊन  सामाजिक कार्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मा.जालिंदर जाधव यांची अखिल भारतीय भटके गोसावी समाज संघटनेच्या  सांगली जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाले बद्दल भिलवडी स्टेशन , गोसावीवाडी सह
परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.