BANNER

The Janshakti News

सामाजिक बांधिलकीचा वसा जपत युनियन बँक ऑफ इंडियाचे 103 व्या वर्षात पदार्पण....
सामाजिक बांधिलकीचा वसा जपत युनियन बँक ऑफ इंडियाचे 103 व्या वर्षात पदार्पण....सांगली | दि. 13/11/2021

दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रिय कार्यालय कोल्हापूर यांच्यातर्फे सांगली येथील सावली बेघर निवारा केंद्रामधील निराधारांना चादर व दिवाळी फराळ देऊन 103 वा वर्धापन दिन सामाजिक बांधिलकी जपून साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माननीय श्री. राहुल रोकडे साहेब उपायुक्त सा.मि.कु. महानगरपालिका व अध्यक्ष म्हणून माननीय श्री रामानंद टीव्ही साहेब क्षेत्र प्रमुख कोल्हापूर हे उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल खोत शाखा प्रबंधक माधवनगर व कार्यक्रमाची प्रस्तावना श्री विश्वास पाटील शाखा प्रबंधक सांगली मुख्य यांनी केले. यानंतर सावली बेघर केंद्राचे संचालक श्री मुस्तफा मुजावर यांनी केंद्राच्या कार्याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले.


कार्यक्रमाची सांगता श्री विवेक रंजन मुख्य प्रबंधक मार्केटयार्ड यांनी आभार प्रदर्शनाने केली. या कार्यक्रमाप्रसंगी श्री राजेश जाधव शाखा प्रबंधक मिरज किल्ला, श्री किरण सराटे शाखा प्रबंधक मिरज, श्री संदीप घुले यु एस के प्रमुख मिरज, श्री मदन पोळ शाखा प्रबंधक सिव्हिल हॉस्पिटल, श्री संजय जोशी शाखाधिकारी अंकली हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्री सदानंद चालीगंजेवार शाखा प्रबंधक शिवाजीनगर सांगली यांनी केले.

रिपोर्टिंग - दिलावरभाई शमनजी...कोल्हापूर