दु:खीत पिडीतांचे अश्रू पुसण्यासाठी सरसावल्या - धनश्री ताई लाड...
पलूस | दि.01/11/2021
कडेगाव पलुस तालुक्यातील कोरोना पीडीत कुटुंबांना आधार देण्यासाठी जि. प. गटनेते शरद भाऊ लाड यांच्या पत्नी सौ.धनश्री ताई लाड सरसावल्या आहेत.
कुटुंबातील सदस्य गेल्या मुळे आपल्या हक्काची माणसे गमावलेले लोक पोरकी झाली आहेत. त्यांच्या समोर दु:खाचा काळोख दाटला आहे. यामध्ये अनेक कुटुंबातील कर्ते लोक गमावल्यामुळे या कुटुंबाचा अर्थिक कणा ढासळला आहे.
सामाजीक संवेदनेची जाणीव ठेवुन सौ. धनश्री ताई लाड यांनी कोरोना पिडीत कुटुंबीयांना दिवाळीच्या निमीत्ताने त्या कुटुंबीयांची दिवाळी गोड व्हावी यासाठी फराळाचे वाटप केले आहे. सासरकडील क्रांती अग्रणी जि. डी. बापुसो लाड व माहेरचा सहकार महर्षी विठ्ठलराव शिंदेचा वारसा संयुक्त पणे पुढे नेण्याचे काम त्या करीत आहेत.
यावेळी पिडीत कुटुंबांनी त्यांच्या समोर आपल्या अडचणींचा पाढा वाचला त्यावेळी धनश्री ताई लाड यांनी कोणत्याही परस्थीतीत क्रांती परिवार आमदार अरुण आण्णा लाड जि प गटनेते शरद भाऊ लाड तसेच लाड कुटुंबीय तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणी तुमच्या प्रत्येक अडीअडचणीत निश्चीतपणाने मदत करेल असे लोकांना आश्वासीत केले
अशीही एक दिवाळी....समाजातील लोकांना सामाजीक अधिसरणातुन मदत करण्याची भुमिका धनश्री ताई लाड यांनी घेतल्याने त्यांचा समाजा प्रती असणारा लोकसेवेचा गुण सर्वत्र चर्चिला जात आहे कडेगाव पलूस तालुक्यातील लोकांमधून त्यांच्या प्रती सहृदयाची व आभाराची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.