BANNER

The Janshakti News

महापूरात नुकसान झालेल्या व अनुदानापासून वंचित असलेल्या माळवाडी येथील पूरग्रस्तांचे माळवाडी ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू....




महापूरात नुकसान झालेल्या व अनुदानापासून वंचित असलेल्या माळवाडी येथील पूरग्रस्तांचे माळवाडी ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू....




भिलवडी | दि. २७/१०/२०२१

माळवाडी ता.पलूस : 
   महापूरामध्ये नुकसान झालेल्या व अनुदानापासून वंचित असलेल्या माळवाडी येथील मातंग समाजातील पूरग्रस्त नागरिकांनी  आज दि.२७ ऑक्टोबर रोजी माळवाडी ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

      २०१९ च्या महापूरातील  घरपडझडीच्या  अनुदानापासून अनेक पूरग्रस्त अद्यापही वंचित आहेत. त्यांना तात्काळ अनुदान मिळावे...

      २०२१ च्या महापूरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांचे घर पडझडीचे पंचनामे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी करून देखील ४० ते ४५ पूरग्रस्तांची नावे यादी मधुन वगळण्यात आलेले आहेत याची चौकशी व्हावी...

       चुकीचे पंचनामे करणाऱ्या व यादीमधून नांवे वगळणाऱ्या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी...

सदरच्या या  प्रमुख मागण्यां घेऊन हे वंचित पूरग्रस्त नागरिक  आजपासून माळवाडी ग्रामपंचायतीच्या समोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आम्ही प्रत्यक्ष उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला असता जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असे उपोषण करणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांच्या कडून सांगण्यात आले आहे.