BANNER

The Janshakti News

वांगी शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी संपन्न... अध्यक्षपदी श्री.कैलास कटरे तर उपाध्यक्षपदी सौ.करिश्मा शिकलगार यांची निवड...वांगी शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी संपन्न...

अध्यक्षपदी श्री.कैलास कटरे तर उपाध्यक्षपदी सौ.करिश्मा शिकलगार यांची निवड...

वांगी | दि. 16/10/2021

वांगी : वांगी जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कैलास मारुती कटरे व उपाध्यक्षपदी करिष्मा अल्ताफ शिकलगार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी, वांगी गावचे सरपंच डॉ. विजय होनमाने ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ तांदळे मुख्याध्यापक वासंती माने माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुहास माळी आदी सर्व उपस्थित होते.


सन 2021 ते 2023 या दोन वर्षांसाठी शाळेच्या शालेय शिक्षण व अन्य कामकाजाबाबत नियोजन करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी शाळेच्यावतीने पालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यामध्ये अध्यक्ष म्हणून कैलास कटरे तर उपाध्यक्ष म्हणून सौ.करिश्मा शिकलगार यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी निवडण्यात आलेली अन्य कार्यकारिणी अशी,दिपाली किशोर सूर्यवंशी, विजय संभाजी सूर्यवंशी,प्रतिभा योगेश जाधव,पवन पांडुरंग जानकर,स्वाती महेश माने,संदीप आनंदा चव्हाण,प्रियंका संदीप सूर्यवंशी,संदीप रामचंद्र जगदाळे,सुप्रिया अमोल कांबळे,पांडुरंग वसंत कटरे


यावेळी ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ तांदळे,रविंद्र कणसे,माजी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुहास माळी आदी इतर मान्यवर उपस्थित होते.