भिलवडी ता.पलूस येथे सां.जि.प.सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांची पत्रकार परीषद संपन्न...
भिलवडी | दि. 02/09/2021
सांगली जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांची आज गुरुवार दि. 02/09/2021 रोजी भिलवडी येथे
पत्रकार परीषद पार पडली.
शासनाने भिलवडी व परिसरातील नुकसानग्रस्त पूरग्रस्त नागरिक, व्यापारी,शेतकरी वर्गास अद्यापही तातडीची मदत दिली नाही ती विनाअट द्यावी,एक ही पूरग्रस्त या मदतीपासून वंचित राहिल्यास वंचित पूरग्रस्तांना सोबत घेवून पलूस तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी दिला आहे.
भिलवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यापुढे बोलताना सुरेंद्र वाळवेकर म्हणाले की,भिलवडी गावातील २९६४ पुरबाधीत कुटुंबे निश्चित केली आहेत.या यादीत घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या २०० कुटुंबांचा समावेश नाही.२१०० कुटुंबाना शासनाने दिलेले स्वस्त धान्य दुकाना मार्फत धान्य मिळाले आहे.धान्य वाटप केलेल्या यादीनुसार पूरग्रस्त कुटुंबाना सानुग्रह अनुदान दिल्यास बाकीचे पूरग्रस्त कुटुंब मदतीपासून वंचित राहणार याबाबत जाब विचारला असता सर्वेक्षण करणारे कर्मचारी ते प्रशासनातील अधिकारी सर्वजण परस्परांकडे बोट दाखवितात.अतिवृष्टी , २०१९ व २०२१ चा महापूर व कोरोनाच्या संकटात कृष्णाकाठचा शेतकरी व व्यापारी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.२०१९ च्या महापूर काळात सरकारने निर्धारित केलेल्या
निकषानूसार शासनाने पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी.शेती पंपाची वीजबिले माफ करावीत,शेती व्यवसाय टिकविण्यासाठी मोठे आर्थिक पॅकेज द्यावे.कृष्णाकाठच्या एकही पूरग्रस्त,शेतकरी,व्यापारी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.अन्यथा पलूस तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा सुरेंद्र वाळवेकर यांनी दिला आहे.