BANNER

The Janshakti News

बूर्ली येथे घरगुती कारणाच्या वादावरून दिराने केली भावजयीची हत्या.... मृत्यू बाबतचा बनाव उघडकीस , दिराला अटक....बूर्ली येथे घरगुती कारणाच्या वादावरून दिराने केली  भावजयीची हत्या....
मृत्यू बाबतचा  बनाव उघडकीस , दिराला अटक....पलूस | दि. २६/०९/२०२१

बुर्ली ता.पलूस येथील सायली केतन पवार वय वर्षे २२ या विवाहित तरुणीची तिचा दिर कुणाल महादेव पवार  वय वर्षे २८ याने घरगुती कारणाच्या वादातून  गुरुवारी हत्या केली असल्याचा छडा पलूस पोलिसांनी लावला आहे.
दरम्यान सदर विवाहितीस जिन्यावरून पाय घसरुन पडून जखमी होऊन उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करून खून अपघात म्हणून सिद्ध करण्याचा बनाव संशयिताच्या अंगलट आला.


या प्रकरणी संशयित आरोपी कुणाल महादेव पवार यास पलूस पोलिसांनी अटक केली.त्यास प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सो. पलूस यांच्या  समोर हजर केले असता मा.न्यायालयाने संशयित आरोपी कुणाल पवार यास २९ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,सायली केतन पवार व तिचा दिर कुणाल महादेव पवार यांच्या दोघांमध्ये घरगुती कारणामुळे वाद होऊन रागाच्या भरात कुणाल पवार यांने   सायली पवार हि बेडरूम मध्ये  एकटीच असल्याचे पाहून तिच्या उजव्या कानाच्या खाली गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तसेच सदरचा प्रकार हा आत्महत्या असल्याचे भासविण्यासाठी तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला.व ती जिन्यावरून पडल्याचा बनाव करून तिला रात्री १:१५ चे दरम्यान सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मयत अवस्थेत दाखल केले होते. असे सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पलूस पोलीस ठाण्यात कळविल्येने पलूस पोलीस ठाण्यात अ.म.र.नं. ४४/२०२१ सीआरपीसी १७४ प्रमाणे मयत दाखल केले होते.मयताच्या सदर चौकशीत सदर जखमा ह्या धारधार शस्त्राने झाल्या असून त्या जिन्यावरून पडून होऊ शकत नाहीत असे डॉक्टरांनी मत दिल्या नंतर मयतेचा भाऊ सुरज सुधाकर नवगण रा.बार्शी ता.बार्शी जि.सोलापूर यांनी कुणाल महादेव पवार विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून कुणाल पवार याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर गुन्ह्याचा  तपास मा.पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम सो. सांगली, मा. अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले सो. सांगली, व  
तासगाव येथील विभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव , सा.पो.फौ.सुधीर शिंदे , पो.हे.काँ. /१७९ गोडे , पो.ना./ २९६ गोरे , पो.काँ./१२७० कदम , पो.ना. / ७० धनवडे , पो.ना.१२३१ मोरे , पो.ना./ ६५२ भोपळे , यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्ह्याचा पढील तपास पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव करीत आहेत.