सातारारोड पाडळी (प्रतिनिधी) — दि. २१ आक्टोबर
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या तक्षशिला सामाजिक सेवा संस्था, सातारारोड पाडळी यांच्या वतीने दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी दिपदानोत्सव दिनानिमित्त दिपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सोहळ्यात 300 दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला आणि "ज्ञान, करुणा आणि प्रबोधन" या संदेशाने संपूर्ण वातावरण प्रबुद्ध झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. संजय आवडे (माजी सरपंच, ग्रामपंचायत सातारारोड पाडळी) यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी गौतम बुद्धांचा संदेश — “अंत दिप भव : म्हणजे स्वतःच प्रकाश बना” याचा अर्थ समजावत सांगितले की, प्रत्येकाने आपल्या जीवनात हा संदेश आचरणात आणल्यास समाजात सकारात्मक व अमुलाग्र परिवर्तन घडू शकते.
कार्यक्रमास विशेष उपस्थिती मा. चंद्रकांत कांबळे सर (माजी वन अधिकारी, महाराष्ट्र शासन) यांची होती.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. काजोल आवडे (उपाध्यक्षा, माता रमाई महिला मंडळ, सातारारोड पाडळी) यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक होते —
मा. श्रीकांत आवडे (कार्यकारी अध्यक्ष), मा. प्रज्वल आवडे (अध्यक्ष), मा. अमोल आवडे (संस्थापक अध्यक्ष), मा. सचिन आवडे (सचिव), मा. संदीप आवडे (खजिनदार), मा. महेश आवडे (जिल्हा संघटक, भारतीय कर्मचारी संघ सातारा), मा. साहिल आवडे, मा. संग्राम आवडे, मा. चेतन आवडे (उपाध्यक्ष), मा. नालंदा आवडे (अध्यक्षा, माता भिमाई महिला बचत गट), तसेच मा. स्वाती आवडे (अध्यक्षा, माता रमाई महिला मंडळ) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान विविध सामाजिक संदेशपर दिपोत्सव साजरा करण्यात आला.
महामानवाच्या विचारांचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात झळकावा, यासाठी हा दिपोत्सव सामाजिक एकतेचा संदेश देऊन यशस्वीपणे पार पडला.
“अंधारातून प्रकाशाकडे, अन्यायातून न्यायाकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे” — या संदेशाने कार्यक्रमास एक वेगळीच झळाळी दिली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





