सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : तासगाव येथील पारंपारिक रथोत्सव पाहण्याकरीता जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून तासगाव शहरामध्ये बहुसंख्य लहान मुले, स्त्रिया, पुरुष गर्दी करीत असतात. कोणतेही वाहन गर्दीत घुसुन नागरीकांचे जिवितास धोका पोहोचू नये याकरीता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २४.०० वाजेपर्यंत पोलीस वाहने, अॅम्बुलन्स, फायर बिग्रेड या वाहनांखेरीज सर्व वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन केले असल्याचे आदेश जारी केले आहेत.
सांगली-मणेराजुरीकडून येणारी वाहतूक (विटा/आटपाडीकडे जाणारी) - कॉलेज कॉर्नर तासगांव - भिलवडी नाका एसटी स्टॅण्ड - विटा नाका -विटा. कॉलेज कॉर्नर तासगांव - भिलवडी नाका - एसटी स्टॅण्ड - विटा नाका – आटपाडी. विट्याकडून तासगावकडे येणारी वाहतूक (सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) - विटा नाका - चिंचणी नाका - चिंचणी चौक-थळेश्वर मंदीर चिंचणी - मणेराजूरी हायवे - कॉलेज कॉर्नर तासगांव – सांगली. आटपाडीकडून तासगावकडे येणारी वाहतूक (सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) - आटपाडी - पुणदी फाटा - वाघमोडे वस्ती चिंचणी-चिंचणी चौक - थळेश्वर मंदीर चिंचणी – मणेराजुरी हायवे - कॉलेज कॉर्नर तासगांव – सांगली. आटपाडीकडून तासगावकडे येणारी वाहतुक (भिलवडी कडे जाणाऱ्या वाहनांसाठी) – आटपाडी - पुणदी फाटा - वाघमोडे वस्ती चिंचणी- चिंचणी चौक - थळेश्वर मंदीर चिंचणी -मणेराजुरी हायवे - कॉलेज कॉर्नर तासगांव - जिजामाता चौक - भिलवडी
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्पष्ट केले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


