yuva MAharashtra IBPS, SBI परीक्षा नॉर्मलायझेशनच्या मुद्द्यावर संसदेत आवाज उठावा : खासदार विशाल पाटील यांना निवेदन

IBPS, SBI परीक्षा नॉर्मलायझेशनच्या मुद्द्यावर संसदेत आवाज उठावा : खासदार विशाल पाटील यांना निवेदन



                      व्हिडीओ पहा.. 



सांगली, दि. 24  : IBPS व SBI बँक भरती परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रियेतील अन्यायकारक बाबींचा प्रश्न संसदेत मांडावा, या मागणीसाठी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी FuturePro Education चे संचालक स्वप्नील तांबेकर, तानाजी ठोंबरे, सचिन टीकोटी, तुषार कांबळे, ऋषिकेश माने, तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, राजू मुलाणी, सागर आठवले, मानतेश कांबळे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, IBPS व SBI या स्पर्धा परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशनची पद्धत पारदर्शक नसून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. एकाच परीक्षेचे विविध स्लॉटमध्ये प्रश्नपत्रिका व त्यांच्या कठीणतेची पातळी वेगळी असते. अशा वेळी गुणांमध्ये कृत्रिम समायोजन करणे हे विद्यार्थ्यांच्या यशावर विपरीत परिणाम करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर, खासदार विशाल पाटील यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत, संबंधित मंत्रालयात प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या या लढ्याला आता राजकीय पाठींबाही मिळताना दिसत आहे.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰