yuva MAharashtra नागठाणे : सरपंच पदाची निवडणूक - गुप्त पद्धतीने मतदान...विरोधी सदस्यांचा पाठिंबा ; सौ.रमिजा लांडगे यांनी मारली बाजी..

नागठाणे : सरपंच पदाची निवडणूक - गुप्त पद्धतीने मतदान...विरोधी सदस्यांचा पाठिंबा ; सौ.रमिजा लांडगे यांनी मारली बाजी..

पती पत्नी सरपंच होण्याची नागठाणे गावच्या इतिहासातील हि पहिलीच घटना....





पलूस दि. १७ : छत्रपती शिवाजी महाराज ग्रामसचिवालय नागठाणे (ता. पलूस) गावच्या सरपंच पदी सौ. रमिजा झाकीरहुसेन लांडगे यांची अवघ्या एका मताने निवड झाली.


यापूर्वी कार्यरत असणारे सरपंच सौ अलका यादव यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी शुक्रवार दि. १६ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.


या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी राजू जाधव (मंडलधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसुल अधिकारी सुमेध पठाणे , ग्रामविकास अधिकारी यशवंत चव्हाण , पोलिस पाटील दिपक कराडकर , महसुल सेवक मुबारक शिराळकर यांनी कामकाज पाहिले.


या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीच्या एकूण 15 सदस्यां पैकी सौ रमिजा झाकीरहुसेन लांडगे व सौ योगिता विजयकुमार शिंदे ह्या दोन महिला उमेदवारांनी एकमेकींच्या परस्परविरोधी सकाळी 11:30 वा. दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल केले. दोन्हीही उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये देखील वैद्य ठरले. व दुपारी 02:00 वाजण्याच्या सुमारास गुप्त पद्धतीने मतदान झाले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर हि निवडणूक अतिशय रंगतदार आणि अतितटीची होणार अशी गावात सर्वत्र चर्चा सुरु झाली.


विजय उमेदवार घोषित करण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतसे दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांची ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर गर्दी जमू लागली.
या अतितटीच्या निवडणुकीत रमिजा लांडगे यांना पंधरा पैकी ८ मते तर योगिता विजयकुमार शिंदे यांना ७ मते मिळाली असून एका मताधिक्याने सौ रमिजा झाकीरहुसेन लांडगे या विजयी उमेदवार असून त्यांची सरपंच पदासाठी निवड करण्यात येत आहे असे निवडणूक अधिकारी राजू जाधव यांनी जाहीर केले.



सौ रमिजा झाकीरहुसेन लांडगे यांची सरपंच पदासाठी निवड होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाकीची आतीषबाजी केली. व सौ रमिजा झाकीरहुसेन लांडगे यांचेवर शुभेच्छा चा वर्षाव केला.
नागठाणे गावच्या इतिहासात पती पत्नी सरपंच होण्याची हि पहिलीच वेळ आहे.
याप्रसंगी भिलवडी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

त्यानंतर नुतन सरपंच सौ रमिजा झाकीरहुसेन लांडगे यांनी ग्रामदैवत नागेश्वर मंदिर व भैरवनाथ मंदिर येथे दर्शन घेतले.


सौ रमिजा लांडगे कॉग्रेसच्या कट्टर समर्थक असुन त्यांना भारतीय जनता पार्टी च्या सदस्यांनी पाठिंबा दिला या गोष्टी ची दिवसभर गावात चर्चा सुरू होती. याचे कारण असे की, फटाक्यांची आकाशबाजी व गुलालाची उधळण चालू असताना कोण सत्ताधारी व कोण विरोधक हे समजून येते नव्हते. कॉग्रेस व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते या जल्लोषात व गुलालात दिसत होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰