yuva MAharashtra आरोग्य तपासणी अभियानाचा घरेलू कामगारांनी लाभ घ्यावा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आरोग्य तपासणी अभियानाचा घरेलू कामगारांनी लाभ घ्यावा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील



        सांगलीदि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्या एकूण 7 हजार 77 घरेलू कामगारांची नोंद असून त्यामध्ये जवळपास 99 टक्के महिला आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयेमहात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नित रूग्णालये व 29 धर्मादाय रुग्णालयांकडून दिनांक 14 मे 2025 रोजी घरेलू कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमाचा घरेलू कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.



            घरेलू कामगारांची मोफत आरोग्य तपासणीबाबत आढावा बैठक उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ, कामगार आयुक्त एम. ए. मुजावर, मा. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.



            18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्षे पूर्ण न झालेल्या घरेलू कामगारांची नोंदणी कामगार विभागाकडून करण्यात येते. अशा नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांची यादी तयार करुन जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये व 29 धर्मादाय रुग्णालयांकडून त्यांच्या सर्व आरोग्य विषयक प्राथमिक तपासण्या करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीमध्ये काही आजार आढळल्यास त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येईल,  दिनांक 14 मे 2025 रोजी सांगली शहरासाठी मालू उच्च माध्यमिक शाळा, शिवाजीनगर, गुलमोहर कॉलनी, सांगली येथे, मिरज शहरासाठी उच्च माध्यमिक शाळा, किल्ला भाग, मिरज येथे व ग्रामीण भागासाठी तालुकास्तरीय ग्रामीण रुग्णालय व उप जिल्हा रुग्णालय येथे तपासणी अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰