yuva MAharashtra पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयात नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयात नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस



 

        सांगलीदि. 8, (जि. मा. का.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमिरज येथील प्रसूतिपश्चात कक्षातून दिनांक 3 मे 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे येथील कविता समाधान अलदार या महिलेचे 3 दिवसांचे पुरुष जातीचे बाळ अज्ञात महिलेने घेऊन गेल्याची घटना घडली होती. दिनांक 5 मे  रोजी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करुन तिच्याकडून चोरी गेलेले बाळ ताब्यात घेऊन त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले होते. या घटनेची राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणसंसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन बाळाची त्याच्या मातेकडून आस्थेने विचारपूस केली व झालेल्या संपूर्ण प्रकरणाची  माहिती जाणून घेतली.



            यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखरमिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता श्रीकांत अहंकारीवैद्यकीय अधीक्षक प्रियांका राठी, मा. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.



            पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. जिल्ह्यात क्राईम राईट कमी होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमिरज येथे बाळ चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर अगदी कमी कालावधीत पोलीस पथकाने बाळ शोधून काढले. हे बाळ सुरक्षित आहे. रूग्णालयात सीसीटीव्ही  यंत्रणा प्रभावीपणे बसविण्यासाठी तसेच रूग्णालयाची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.




            या प्रकरणात पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करून आरोपी महिलेस अटक करून बाळ ताब्यात घेतल्याबाबत तपास पथकाचे अभिनंदन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकी प्रसंगी या पथकातील सर्वांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰