केमिकलचा वापर न करता पांढरे केस करा काळे
आजकाल धूळ, प्रदूषण, ताण-तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक जण हेअर कलर, हेअर डायचा वापर करतात. मात्र त्यामध्ये असणाऱ्या केमिकलमुळे केस कमकुवत बनतात, गळतात. काही जणांना त्वचेची ॲलर्जी होते.
अकाली पांढऱ्या केसांना काही घरगुती उपाय करून केस काळे करता येतात.
१) खोबरेल तेल
खोबरेल तेलात लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मालिश करा. त्यामुळे केस काळे आणि चमकदार होतील.
आवळ्याचे बारीक तुकडे गरम खोबरेल तेलात मिक्स करुन केसांना लावा.
२) आवळा
आवळ्याला मेंहदीमध्येसुद्धा मिसळून लावा.
नियमित आवळा खाण्याने सुद्धा केस काळे होतात.
३) ब्लॅक टी
ब्लॅक टीच्या अर्काने केस धुवा. दोन दिवसांतून एकदा हे केल्याने फरक दिसून येईल.
४ ) कोरफड
कोरफड जेलमध्ये लिंबूचा रस टाकून पेस्ट बनवून केसांना आणि मुळांना लावा. हे नियमित लावल्याने पांढरे केस काळे होतील.
५) पेरुची पाने
पेरुची पाने वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावा.
६) कडीपत्ता
कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने नियमितपणे केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा.
मोहरीच्या तेलामध्ये कडीपत्ता उकळून घ्या. हे तेल नियमित रात्री झोपताना केसांना लावा.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰