संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ
⬇️
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे संस्थापक ब्रह्मा बाबा यांच्या 56 व्या स्मृतिदिनानिमित्त 18 जानेवारी हा दिवस विश्वशांती दिवस म्हणून साजरा केला गेला. प्रजापिता ब्रह्मा यांनी ही संस्था इ. स. 1937 साली स्थापन केली. 18 जानेवारी 1969 साली वयाच्या 93 व्या वर्षी ते अव्यक्त झाले. नारीशक्तीला प्राधान्य देऊन संपूर्ण ही संस्था महिलांच्या द्वारे संचालित आहे. आज विद्यालयाच्या प्रमुख स्थानी सगळे मार्गदर्शक करणारे महिला आहेत. या नारीशक्तीला पुढे करण्याचे श्रेष्ठ कार्य प्रजापिता ब्रह्मा यांनी केले. आणि म्हणून या दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन साजरा केला गेला. सर्व पत्रकारांना सन्मानित केलं गेलं आज हे विद्यालय महिलांच्याद्वारे 140 देशांच्या अंतर्गत कार्य करत आहे. तसेच ही संस्था संयुक्त राष्ट्रांशी देखील संलग्न आहे. तर नारीशक्तीला पुढे आणण्याचे जे श्रेष्ठ कार्य केल्याबद्दल प्रजापिता ब्रह्मा यांना शत् शत् नमन... ओम शांती...
भिलवडी : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व मराठी पत्रकार दीनाचे औचित्य साधून ब्रह्मा कुमारीज् सेवाकेंद्र भिलवडी यांच्या वतीने मिरा बहेणजी यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी व परिसरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांच सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारीज् मिरा बहेणजी तर प्रमुख अतिथी म्हणून भिलवडीच्या प्रथम नागरिक सौ. सीमा शेटे तर सत्कार मुर्ती म्हणून भिलवडी परिसरातील सर्व प्रतिष्ठित पत्रकार उपस्थित होते.
भिलवडीच्या प्रथम नागरिक सौ. सीमा शेटे आणि ब्रह्माकुमारीज् मिरा बहेणजी यांच्या शुभहस्ते उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित अनेक मान्यवरानी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच सीमाताई शेटे यांनी या संस्थेबद्दलचा अनुभव सांगताना म्हणाल्या की,
हे ठिकाण अतिशय शांत आहे आणि जग शांत आणि आनंदी बनवण्याचा त्यांचा हेतू आहे, प्रत्येक मानवाने कोणत्याही तणाव आणि तणावाशिवाय आनंदी जीवन जगले पाहिजे.
ब्रह्माकुमारीज मिरा बहेणजी यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना ब्रह्माकुमारीज् सेवा केंद्र मार्फत करीत असलेल्या सामाजिक उपक्रमाविषयक माहिती दिली. पत्रकारांचे कार्य हे सामाजिक सदभाव,अध्यात्मिक विकास आणि सकारात्मक समाजनिर्मिती करण्यासाठी बांधील आहे.
लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वाना दैनंदिन जीवनात ताण तणावाचा सामना करावा लागतो त्यामुळे कुटुंबातील मानसिक स्वास्थ बिघडत चालले आहे त्यासाठी उपचार म्हणून ब्रह्माकुमारीज् सेवा केंद्रातून दिले जाणारे ज्ञान उपयुक्त आहे. भिलवडी व परिसरातील पत्रकारा सह सर्वांनी ब्राह्मकुमारीज च्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.
भारतीय लोकशाहीचे प्रसार माध्यम चौथा आधारस्तंभ असून निःस्वार्थ पणे समाजकार्य करणारा, समाजाला न्याय मिळवून देणारा महत्वाचा घटक आहे. समाजपरिवर्तनाची दिशा निश्चित करण्याची फार मोठी शक्ती प्रसार माध्यमात आहे त्या दिव्य शक्तीचा उपयोग समाजहितासाठी अधिक सजग राहून व समर्थपणे करावा असा आशावाद मिरा बेहणजी यांनी व्यक्त केला व सत्कार स्वीकारण्यासाठी आल्याबद्दल सर्व पत्रकारांना विशेष धन्यवाद देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रजापिता ब्रह्मा कुमारीज् ईश्वरीय विश्व विद्यालय भिलवडी केंद्राच्या ज्ञानार्थी भाऊ बहिणींनी विशेष सहकार्य केले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰