कुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यास हंगाम सन २०२४-२५ मध्ये गळीतास आलेल्या व येणा-या ऊसाला पहिला हप्ता रु. ३,२००/- प्रति मे.टन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला असून, उर्वरीत निघाणारी एफ.आर.पी. ची रक्कम दिवाळीपूर्वी आदा केली जाणार असलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, कारखान्याने आजअखेर ४ लाख ३७ हजार ३७० मे.टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तसेच कारखान्याचे उपपदार्थ प्रकल्प को-जनरेशन व डिस्टीलरी पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. आपण सन २०२४-२५ च्या हंगामासाठी १३ लाख मे. टन ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी लागणारी सक्षम तोडणी-वाहतूक यंत्रणेची उभारणी केली आहे. कारखान्याने नियमितपणे चांगला दर देणेची परंपरा जोपासली. प्रारदर्शकपणे कामकाज करुन अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. यावर्षी हंगामाच्या सुरवातीलाच कारखान्याचे ढवळी येथील ऊस उत्पादक शेतकरी सहदेव यशवंत पाटील यांनी एकरी १४४.५९४ मे. टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेतले आहे. मागील वर्षी दुष्काळ व यावर्षी अतिवृष्टी अशी प्रतिकूल हवामान परिस्थिती असतानाही केवळ तंत्रज्ञानाचा वापर व जिद्द या जोरावर त्यांनी हे उत्पादन मिळविले. अशापद्धतीने शेतक-यांच्या उत्पादनात वाढ होवनू त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अनेक ऊस विकासाच्या योजना राबवून उत्पादन वाढीच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. त्यामुळे कारखान्यास चांगल्या प्रतिच्या ऊसाचा पुरवठा शेतकरी करीत आहेत. कारखान्याच्या उद्दीष्ट पुर्ततेसाठी सभासद व ऊस उत्पादकांनी आपला नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले..
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिंगबर पाटील, संचालक रामचंद्र देशमुख, बाळकृष्ण दिवाणजी, अशोक विभूते, सुभाष वडेर, विजय पाटील, संजय पवार, प्रभाकर माळी, अश्विनी पाटील, अंजना सूर्यवंशी, अविनाश माळी, संग्राम जाधव, जितेंद्र पाटील, अनिल पवार, दिलीप थोरबोले, जयप्रकाश साळुंखे, सतीश चौगुले, शीतल बिरनाळे, वैभव पवार, सुकुमार पाटील, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे यांच्यासह अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰