yuva MAharashtra शालेय जीवनापासून ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जागरुक राहिल्यास भविष्यात होणारी फसवणूक टाळता येऊ शकते ...मिलींद सुतार

शालेय जीवनापासून ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जागरुक राहिल्यास भविष्यात होणारी फसवणूक टाळता येऊ शकते ...मिलींद सुतार



तासगांव दि. २५ : तासगाव (जि. सांगली) येथील चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदीरमध्ये झालेल्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मा. मिलींद सुतार (जिल्हा संघटक ग्राहक पंचायत ) म्हणाले की, शालेय जीवनापासून ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जागरुक राहिल्यास भविष्यात होणारी फसवणूक टाळता येऊ शकते. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासा व्यतिरिक्त विविध कायद्यांची मुलभूत माहिती घेणं आवश्यक आहे. मोबाईलचा वापर करुन नेटवर उपलब्ध असणाऱ्या विविध क्षेत्रातील जीवनोपयोगी गोष्टी समजून घ्याव्यात. तसेच कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याची पक्की पावती घ्यायची सवय आत्तापासून लावून घ्यावी.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक मा. श्री प्र.ना ऐतवडेकर सर होते. त्यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. मा. नितीन जोशी सर यांनी आभार मानले.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰