yuva MAharashtra अल्पसंख्याक समुदायाने शासकीय योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा

अल्पसंख्याक समुदायाने शासकीय योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा



सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या शासकीय योजनांचा लाभ घेऊन अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तिंनी स्वतःची उन्नती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.



अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित अल्पसंख्याकांना हक्कांची जाणीव जागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अशोक पाटील, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील, डॉ. अजित पाटील, ॲड. फारूक कोतवाल, डॉ. अब्दुलमजिद इनामदार, मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सलिम नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, अल्पसंख्याक समुदायातील नागरिक उपस्थित होते.



जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, अल्पसंख्याकांसाठी असलेला निधी त्यांच्यासाठीच खर्च करावा. त्याचबरोबर इतर सर्वसाधारण योजना, शैक्षणिक योजना, कौशल्य विकासाच्या योजनांचाही अल्पसंख्याक समुदायातील लोक लाभ घेवू शकतात. उद्योजकता व रोजगाराच्या चांगल्या संधी मिळण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाकडील विविध प्रकारच्या योजनांमधून आपआपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कौशल्य प्रशिक्षण घ्यावे. शिक्षण, रोजगार निर्मिती व उद्योजकता यावर सर्वांनी काम करावे. जेथे जेथे अडचण येईल तेथे सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी आश्वासित केले.



यावेळी डॉ. अजित पाटील यांनी अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या भारतीय संविधानातील तरतुदी व त्यांचे फायदे, ॲड. फारूक कोतवाल यांनी अल्पसंख्याक नागरिकांचे हक्क व त्यांच्या संरक्षणासाठीचे फायदे, डॉ. अब्दुलमजिद इनामदार यांनी अल्पसंख्याक समाजातील प्रश्न व त्यावरील उपाययोजना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक समुदायासाठी असणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत व या योजनांचा लाभ घेवून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन केले. त्याचबरोबर समाजाची उन्नती होण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगून पालक व मुलांमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. सुजाण नागरिक होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अशोक पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती यांच्याकडून अल्पसंख्याक समुहासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती देवून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

      मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सलिम नदाफ यांनी महामंडळामार्फत अल्पसंख्याक समुदायासाठी असलेल्या योजनांची माहिती देवून आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

        यावेळी मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाकडून शैक्षणिक कर्ज मंजुरी पत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते संबंधित विद्यार्थ्यांना करण्यात आले.

        सूत्रसंचालन नौशाद राजेखान यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक सलिम नदाफ यांनी तर अशोक पाटील यांनी आभार मानले.


हेही पहा...

https://youtu.be/GOjot_OhU5s?si=2zP_fWPjg5FDKhu4

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰