yuva MAharashtra गुणांचा खजिना – घृतकुमारी (ॲलोवेरा/कोरफड)

गुणांचा खजिना – घृतकुमारी (ॲलोवेरा/कोरफड)




गुणांचा खजिना – घृतकुमारी (ॲलोवेरा/कोरफड)




ॲलोवेरा आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये विनासायास लावता येण्यासारखे असते. आजकाल ॲलोवेराचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे समोर यावयास लागल्याने रस, जेल अश्या अनेक प्रकारे लोक ॲलोवेराचा उपयोग करताना दिसत आहेत.

दात घासल्यानंतरही दातांमध्ये प्लाक किंवा किटाणू राहतातच. त्यामुळे तोंडामधून क्वचित दुर्गंधी येऊ लागते. ही दुर्गंधी येऊ नये यासाठी माऊथवॉश उपयोगात आणला जातो. ॲलोवेराच्या रसाचा वापर देखील प्राकृतिक माऊथवॉश म्हणून करता येतो. या रसामुळे तोंडातील प्लाक आणि किटाणू दूर होऊन दातांचे आरोग्य चांगले राहते. ॲलोवेराचा वापर माऊथवॉश म्हणून केल्याने हिरड्याही बळकट होतात.

कित्येकदा जेवण जास्त झाल्याने, जेवणाच्या वेळा गडबडल्याने किंवा जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ होत असल्याची भावना होते, किंवा ॲसिडीटी होते. अशावेळी ॲलोवेराच्या रसाच्या सेवनाने फायदा होतो. यामुळे छातीतील जळजळ दूर होऊन ॲसिडीटी ही कमी होते. तसेच दररोज सकाळी रिकाम्या पोटी ॲलोवेराचा रस कोमट पाण्यातून घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते.

केस गळत असल्यास ॲलोवेराचा गर केसांना लावल्याने फायदा होतो. तसेच चेहऱ्यावर उष्णतेमुळे मुरुमे येत असल्यासही ॲलोवेराच्या गराने फायदा होतो. या गराने त्वचेचा रंग उजळण्यास व पोत सुधारण्यास मदत होते. त्याचमुळे पुष्कळशा स्कीन क्रीम्समध्ये ॲलोवेराच्या गराचा अंश मिसळलेला असतो.ॲलोवेराच्या गराच्या वापराने वयपरत्वे त्वचेवर आलेल्या सुकुत्याही कमी होतात, व त्वचा सुंदर दिसू लागते.

संकलन-
 
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰