yuva MAharashtra नाशिक येथे सीडीएस परीक्षा पूर्वतयारीच्या मोफत प्रशिक्षणासाठी 15 जानेवारीला मुलाखती

नाशिक येथे सीडीएस परीक्षा पूर्वतयारीच्या मोफत प्रशिक्षणासाठी 15 जानेवारीला मुलाखती



सांगलीदि. 26, (जि. मा. का.) : भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि.                        20 जानेवारी 2025 ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत सी.डी.एसकोर्स क्र. 64 आयोजित करण्यात येत आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी मुलाखतीस हजर राहावेअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षणनिवास व भोजन दिले जाते. मुलाखतीस येते वेळी उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील सी.डी.एस-64 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

 सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत -  () उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. (उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. (CDS) या परिक्षेकरिता ऑनलाईनव्दारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्र पूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांचा ईमेल आय डी  training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र. 9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठीअसून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰