yuva MAharashtra एचआयव्हीवर मात करण्यासाठी आयसीटीसी केंद्रांचे महत्व अनन्यसाधारण

एचआयव्हीवर मात करण्यासाठी आयसीटीसी केंद्रांचे महत्व अनन्यसाधारण


एचआयव्हीवर मात करण्यासाठी आयसीटीसी केंद्रांचे महत्व अनन्यसाधारण
 

जागतिक एड्स दिन म्हणून 1 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. काही वर्षापूर्वी एच. आय. व्ही. / एड्स भयंकर वाटायचे. पण आज ही परिस्थिती बदलली आहे. याचे सर्व श्रेय महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्यामार्फत चालविलेल्या विविध उपक्रमांना जाते. त्यामध्ये माहिती शिक्षण संवादसमुपदेशन व चाचणी करण्याच्या अनुषंगाने आयसीटीसी केंद्रांचे महत्व अनन्यसाधारण आहे.

2001 मध्ये ऐच्छिक तपासणी व मोफत सल्ला केंद्राची (ICTC) सुरुवात झाली. पूर्वी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली ही केंदे आता Stand Alone ICTC तालुका स्तरापर्यंत तर Facility integrated ICTC या प्राथमिक आरोग्य केंद्रे व खासगी रुग्णालयांच्या मदतीने प्रत्येक गावोगावी आहेत. एकाच छताखाली सर्व वयोगटातील स्त्रीपुरूषगरोदर माता व बालकांची एच. आय. व्ही. तपासणी अगदी मोफत सुरू झाली.

आयसीटीसी मध्ये येणाऱ्या सर्व लोकांना एच. आय. व्ही. एड्स बद्दल चाचणी पूर्व समुपदेशन केले जाते. यानंतर त्यांची संमती असेल तर एच. आय. व्ही. तपासणी केली जाते. चाचणीपूर्व समुपदेशनात एच.आय.व्ही.चा रिर्पोट स्वीकारण्याची त्या व्यक्तीची मानसिक तयारी करून मग त्यांची टेस्ट केली जाते. एच. आय. व्ही.चा रिर्पोट पॉझीटिव्ह असो की निगेटिव्ह प्रत्येक व्यक्तीला चाचणी पश्चात समुपदेशन केले जाते. व्यक्तीचा रिर्पोट निगेटिव्ह आला तर आपण आयुष्यभर निगेटिव्ह रहाण्यासाठी अति जोखमीचे र्तन कमी करण्याबद्दल व निरोध वापरण्याबाबत सविस्तर समुपदेशन केले जाते. त्या व्यक्तीला गवाक्ष काळाबद्दल माहिती देऊन पुन्हा तीन महीन्यांनी बोलविले जाते. जर व्यक्तीचा रिर्पोट पॉझीटिव्ह आला तर त्याचा रिपोर्ट हा गोपनीय ठेवला जातो व त्या व्यक्तीला चाचणी पश्चातचे समुपदेशन करून त्याच्या जोडीदाराची तपासणी केली जाते. व्यक्तीचा रिर्पोट पॉझीटिव्ह असला तर त्याला वैयक्तिक व कौटुंबिक समुपदेशन केले जाते. तसेच त्यांच्या मुलांची ही तपासणी केली जाते. पॉझीटिव्ह व्यक्तीला रिर्पोट देवून येथेच या केंद्राची जबाबदारी थांबत नाही तर त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी ए.आर.टी. केंद्राकडे संदर्भित केले जाते. तेथे त्या व्यक्तीची CD4 तपासणी Viral load तपासणी केली जाते व पुढील उपचार मोफत सुरू केले जातात. एखादी गरोदर माता एच. आय. व्ही. पॉझीटिव्ह आढळली तर तीच्या पतीचे ही समुपदेशन करून एच. आय. व्ही. तपासणी केली जाते. तिच्या पासून तिच्या बाळाला एच आय व्ही. ची लागण होऊ नये म्हणुन तिला व बाळाला औषधोपचार केले जातात. त्यानंतर बाळ दिड वर्षाचे होईपर्यंत बाळाची नियमित तपासणी केली जाते व दिड वर्षानंतर त्या बाळाचा जो रिर्पोट असेल तो ग्राह्य मानला जातो.

 

HIV/AIDS महणजे काय?

·         HIV-मानवी रोगप्रतिकार शक्तीचा ऱ्हास करणारा विषाणू.

·         AIDS - मानयी रोगप्रतिकार शक्तीचा ऱ्हास झाल्याने दिणाऱ्या रोग लक्षणांचा समुह

 

HIV संगर्ग होण्याचे मार्ग

 

·         HIV संसर्गित व्यक्तीसोत निरोधचा वापर न करता आलेले लैंगिक संबंध

·         HIV संसर्गित रक्त किंवा रक्तघटक इतर व्यक्तीस चढल्याने

·         HIV संसर्गित दुषित सुया व सिरींज वापरल्याने

·          HIV संसर्गित गर्भवती मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला

इतर कोणत्याही कारणाने HIV ची लागण होत नसून भांडीकपडे किंवा शौच्छालयाचा वापर केल्याने एकत्र राहिल्याने किंवा जेवण केल्याने प्रेम वाढते एच. आय. व्ही. नाही.

 

निरोध

 

निरोध हा जसा कुटुंबनियोजन किंवा नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी उपयोगी पडतो तसाच एच.आय.व्ही.व इतर लैंगिक संबंधा‌द्वारे पसरणारे आजार थांबवण्यासाठी याचा खुप मोठा उपयोग होतो. एच. आय. व्ही. ची लागण होऊ नये यासाठी निरोध जसा उपयोगी पडतो तसाच जर पती पत्नी HIV संसर्गित जरी असले तरी त्यांनी निरोधचा वापर करणे गरजेचे आहे. कारण यामुळे औषधोपचारास प्रतिकार शक्ती निर्माण झालेला विषाणू एका व्यकतीच्या शरीरातुन दुसऱ्या व्यकतीच्या शरीरात जात नाही. त्यामुळे HIV संसर्गित व्यक्तीस सुरू केलेली ART औपधोपचार पध्दती यशस्वीपणे लागू पड़ते व या विषाणूस आपण नियंत्रणात ठेऊ शकतो.

 

Treat All

 

सर्व एच. आय. व्ही. संसर्गित रूग्णांना एआरटी औषधपचार दिला जातो. सुरूवातीच्या काळात ज्या एच. आय. व्ही. संसर्गित रूग्णांचा CD4 200 पेक्षा कमी असेल त्या रूग्णांना एआरटी औषधपचार दिला जात होतात्या नंतर शासनाने CD4 350 पेक्षा कमी असणाऱ्या रूग्णांना एआरटी औषधोपचार चालू करण्याचा निकष केला व नंतर CD4 500 चा निक केला. परंतु नविन अभ्यासाअंती निदर्शनास आले आहे की, जरी रूग्णांचा CD, जास्त असला व उपचार सुरू केले तर HIV चे शरिरावरील दुष्पपरिणाम कमी होतातरूग्णांचे जीवनमान उंचावते व संधीसाधू आजारास बळी पडत नाही. दि. ५ मे २०१७ पासून त्यामुळे Treat all Policy अंतर्गत सर्वच HIV संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सांगली जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या एकूण रूग्णांपैकी ९८.१४ टक्के रुग्णांचा व्हायरल लोड दलेला (Supressed) आहे.

 

HIV संसर्गित पालकांच्याकडुन बाळाला होणारा संसर्ग

 

एच. आय. की एड्स संसर्गाचे चार मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग म्हणजे पालकांच्या कडून बाळाला होणारा HIV संसर्ग.

गरोदर मातेकडून बाळाला होणारा संसर्ग टाळण्यासाठी सर्व गरोदर स्त्रीयांची HIV/AIDS या आजाराची तपासणी केली जाते. बाळाची आई एच. आय. व्ही संसर्गित असेल तर तिचे समुपदेशन करून तीला एआरटी हे औषध सुरू केले जाते. त्याचबरोबर तिच्या कुटुंबाचे समुपदेशन करून तपासणी केली जाते. तिची प्रसुती सरकारी दवाखान्यात केली जाते. तसेच प्रसुती झाल्यानंतर बाळाची काळजी, संगोपनसेच स्थनपान किंवा पर्यायी आहार याबाबत समुपदेशन केले जाते व मुलाला एच. आय. व्हीबाधीत होण्यापासून वाचविण्यासाठी सर्व प्रकारचे समुपदेशन व उपचार दिले जातात. त्यानंतर बाळाची ICTC Center ला 6 आठवडे, 6 महीने, 12 महीन्यांमध्ये HIV test ही DNA- PCR द्वारे नारी संशोधन केंद पुणे च्या माध्यमातून केली जाते. तसेच 18 महीण्याची Rapid Test ICTC Centre ला केली जाते.

समुपदेशकांनी केलेल्या समुपदेशनाचे पालकांकडून योग्य पालन झाल्यास पालकापासून बालकास होणारा HIV संसर्ग योग्य औषधोपचारा‌द्वारे पूर्णपणे रोखता येऊ शकतो.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मार्फत सुरू करण्यात आलेला EMTCT हा शासनाचा उल्लेखनिय कार्यक्रम आहे. या मार्फत सन 2024-25 (एप्रिल ते ऑक्टोबर 2024) या आर्थिक वर्षा मध्ये एकूण 183 बालके तपासण्यात आली. त्यापैकी 181 बालके एचआयव्ही आजारापासून मुक्त निदर्शनास आली आणि उरलेल्या बालकांना पुढील औषधोपचारासाठी एआरटी विभागाशी संलग्नीत करण्यात आले.

 

उद्दिष्ठ व संकल्पना

राष्ट्रीय एड्स नियत्रंण संस्था नवी दिल्ली द्वारे सन २०२६ अखेर ९५ : ९५ :९५ चे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. या तीन ९५ पैकी प्रथम ९५ हा जे लोक एचआयव्ही संसर्गित आहेत त्यापैकी किमान ९५ टक्के लोकांना ज्यांना एचआयव्हीची लागण झालेली आहे याची माहीती त्यांना असणे आवश्यक आहे. जेणेकरून ते स्वत:वर उपचार घेतील व त्यांच्यापासून इतरांना एचआयव्ही चा प्रसार होण्यास प्रतिबंध करतील.

व्दितीय ९५ हा ज्या लोकांना त्यांची एचआयव्हीची स्थिती समजली आहे त्यापैकी किमान ९५ टक्के व्यक्ती या एआरटी उपचारावरती येतील.

तृतीय ९५ हा जे लोक एआरटी उपचारावरती आलेत त्यापैकी किमान ९५ टक्के व्यक्तींना योग्य उपचार मिळून एच‌आयव्ही या विषाणूंची संख्या शरीरामध्ये नियंत्रणात राहून स्वस्थ आयुष्य जगतील.

९५ : ९५ :९५  चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी "Take the Rights Path" "मार्ग हक्काचा, सन्मानाचा" हि यावर्षीची संकल्पना आहे. याद्वारे सर्वच लोकांनी तपासणीद्वारे स्वतःची एचआयव्ही स्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. परंतू यामध्ये प्राधान्य क्रमाणे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियासमलिंगी पुरूष व त्यांचे ग्राहकट्रक चालक-वाहक, स्थलांतरीत कामगार तसेच एकापेक्षा अधिक लैंगिक जोडीदार असणाऱ्यांनी यामध्ये पुढाकार घेणे गरजेचे आहे. याचबरोबर ज्या व्यक्तींचा जोडीदार एच‌आय‌व्ही संसर्गित आहे अशा व्यक्ती किंवा ज्यांचे आई वडिल एच‌आय‌व्ही संसर्गित आहेत अशा मुलांची तपासणी होणे क्रमप्राप्त आहे. यामुळे ज्या लोकांना या तपासणी द्वारे एच‌आय‌व्हीचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास येईल त्यांना हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी मोफत औषधोपचार ART केंद्राद्वारे दिला जाईल व त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारून जीवणमान उंचावेल.

 

ART ADHERANCE

 

ART ADHERANCE म्हणजे एआरटी औषधातील सातत्य. एच‌आय‌व्ही संसर्ग किंवा एडस्‍ हा आजार उच्च रक्तदाबव व मधुमेह या आजारासारखा नियत्रंणात ठेवण्यासारखा आजार आहे. हा सध्याच्या परिस्थीतीमध्ये पूर्ण बरा होणारा आजार नाही. त्यामुळे एच‌आय‌व्ही संसर्गित व्यक्तीला आयुष्यभर औषधोपचार घ्यावा लागतो. परंतु यामध्ये काही रूग्ण सातत्य ठेवत नाहीत. एआरटी ची औषधे एक किंवा दोन दिवस नाही घेतली तरी तात्काळ कोणताच त्रास एच‌आय‌व्ही संसर्गित रुग्णास जाणवत नाही, परंतु औषधे चुकल्याने शरीरातील विषाणू एआरटी औषधा प्रतिकार करण्यास सज्ज होतो किंवा एआरटी औषधा दाद न देणारा बनतो, त्यामुळे या रूग्णांना अधिक ताकदीची सेकंड लाइन किंवा थर्ड लाईनची औषधे द्यावी लागतात, जी रूग्णांना अधिश त्रासदायक असतात. त्यामुळे रूग्णांनी सातत्य ठेवल्यास भविष्यात होणार त्रास टाळू शकतात. तसेच जर ही औषधे नियमित घेतली तर रुग्णांचा व्हायरल लोड दबलेला (Supressed) राहून शरीर इतर संधीसाधू आजारांना ळी पडत नाही.

 

जिल्हा प्रशासनाकडून गरजू HIV संसर्गित रुग्णांकरीता वेगळी डायलेसीस मशीन

 

यावर्षी HIV संर्गित रूग्णास डायलेसिस ची गरज असल्यास त्यास वेगळ्या (इतर रूग्णांना वापरणारी मशिनः सोडून) डायलेसिस मशिनची आवश्यकता असते. अशी अतिरिक्त मशिन आपल्या रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात जास्तीची रक्कम अदा करावी लागत होती.                 यावर्षी मा.  जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडून नविन डायलेसिस मशिन घेण्यासाठी २२ लक्ष ९० हजार रूपये मंजूर केले असून ही मशीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी कार्यान्वीत झाली आहे.

 

१०९७ साधन हेल्पलाईन टोल फ्री नंबर

 

मोबाइल किंवा लँडलाइन फोन वरून १०९७ या साधन हेल्पलाईन नंरद्वारे आपण एचआयव्ही/एडस् व गुप्तरोग आजाराबाबत मोफत व कोणत्याही भाषेमध्ये माहिती घेऊ शकतो.

यावर्षी जागतिक एड्स दिन व पंधरवड्यामध्ये मा. जिल्हाधिकारी व मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपक्रम राविण्यात येणार आहेत.

·         जिल्हास्तरावर व तालुकास्तरांवर प्रभातफेरीचे आयोजन.

·         जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने या पुढील वर्षामध्ये HIV संसर्गित लोकांना उद्योगाच्या संधी मिळवून देण्यासाठी स्कील इंडिया उपक्रमातून प्रशिक्षण व पतपुरवठा करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

·         विविध अशासकीय संस्था  देणगीदार यांच्या मदतीने HIV संसर्गित १८ वर्षे पेक्षा कमी वयोगटातील मुला-मुलींना व HB कमी असलेल्या रुग्णांना पोषण आहार देणे.

·         YRG Care संस्थेच्या मदतीने ART Plus Center P.V.P.Govt Hospital Sangli येथे २.५ लक्ष रूपयाची मदत ही एआरटी विभागामध्ये येणाऱ्या रुग्णसेवेकरीता असलेल्या इमारतीचे नुतनीकरण करण्यासाठी झाली आहे.

·         HIV संसर्गित मुला-मुलींच्या साठी वधु वर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे.

... डॉ. विवेक सावंत ( जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष)

 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰