yuva MAharashtra विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नामनिर्देशन प्रक्रिया आजपासून

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नामनिर्देशन प्रक्रिया आजपासून



 

          सांगली, दि. 21 (माध्यम कक्ष) : मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार या निवडणूकीची अधिसूचना मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिध्द होत असून दि. 22 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.

          नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. 29 ऑक्टोबर 2024 असून नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 आहे. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख  सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024आहे.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰