BANNER

The Janshakti News

कासेगावच्या गावठाण प्रश्नाबाबत सामाजिक नेते डॉ.भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुका पंचायत समितीवर मोर्चा



वाळवा दि. 23 : कासेगावच्या गावठाण प्रश्नाबाबत सामाजिक नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुका पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ते आंदोलन सुरू राहील असा निर्धार श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कासेगावातील अतिक्रमण धारकांनी केलेला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की १९७३,७४ साली कासेगाव मध्ये सिटीसर्वे लागू झाला त्यावेळी कासेगाव च्या पूर्व भागामध्ये वास्तव्यास असणारे मातंग चर्मकार, बौद्ध ,मुस्लिम, रामोशी भोई शेतकरी मराठा असे बहुसंख्य बहुजन समाजातील कुटुंबे वास्तव्यास आहेत यांच्या गावठाण मध्ये समावेश झाला नाही त्यांच्या घराचे उतारे महाराष्ट्र शासनाच्या नावे निघत असून सदरचे उतारे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या नावे निघावेत या कामी त्यांची घरे त्यांच्या नावावर व्हावीत यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर अनेक वर्ष सातत्याने प्रयत्नशील राहिलेले आहेत याचा भाग म्हणून आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी इस्लामपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्च्याची सुरुवात झाली.


 हा मोर्चा इस्लामपूर शहराच्या प्रमुख मार्गावरून वाळवा तालुका पंचायत समिती कार्यालयावर धडकला त्या ठिकाणी गटविकास अधिकारी आणि डॉक्टर भारत पाटणकर व अतिक्रमणधारकांच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली असून यामध्ये महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी यांची आवश्यकता असून उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत गटविकास अधिकारी आणि अतिक्रमणधारकांची बैठक उद्या होऊन यावर सकारात्मक निर्णय होणार आहे जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत अतिक्रमणधारक पंचायत समिती समोरून जाणार नाही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरूच राहील असे डॉक्टर भारत पाटणकर यांनी मोर्चाला संबोधताना स्पष्ट केले. या मोर्चामध्ये कॉम्रेड जयंती निकम वंचितचे सुमेध माने, संदीप धुमाळ यांच्यासह सर्व अतिक्रमण धारक कुटुंबातील महिला पुरुष मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी योगेंद्र पाठवते, राजेंद्र पाठवते, नामदेव पाटसुते, बाबुराव माने, हंबीरराव पाटसुते,विजय भिंगारदेवे
वसंत माने ,प्रियंका पाटसुते ,अंजना मिसाळ ,सुनीता हेगडे , रूपाली माने.यांनी परिश्रम घेतले
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔴 https://youtube.com/@thejanshakatinews5707

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖