सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : ग्राहकांना सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या व्यापक जनहिताच्या व सार्वजनिक आरोग्य दृष्टिकोनातून पावसाळी दिवसांत दुषीत पाणी व अस्वच्छतेमुळे रोगराई पसरू नये म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली पावसाळी मोहिमेंतर्गत सांगली शहर व जिल्ह्यात हॉटेल रेस्टॉरंट ची विशेष तपासणी मोहिम अन्न व औषध प्रशासनाच्या सांगली कार्यालयामार्फत राबविण्यात आली. एकूण 23 हॉटेल, रेस्टॉरंटच्या सखोल तपासण्या करण्यात आल्या असून तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी/ दोषांच्या अनुषंगाने रेस्टॉरंट ना सुधारणा नोटीस देण्यात आल्या आहेत. तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीमध्ये सुधारणा न केल्यास फेर तपासणी अंती आस्थापणांनी त्रुटी/ दोषांची पूर्तता न केल्यास परवाना निलंबनाबाबतची कारवाई घेण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
हॉटेल के. Lounge - सांगली, हॉटेल काके द हत्ती - सांगली, हॉटेल नंदनवन - सांगली, हॉटेल गावरण - सांगली, हॉटेल नटराज मिरज/सांगली, हॉटेल ब्लॅक पर्ल -सांगली, हॉटेल मिरची -मिरज, हॉटेल अजवा - सांगली, हॉटेल 24 के विजयनगर -सांगली, हॉटेल विजय मसूर - सांगली, हॉटेल आर्या - सांगली, हॉटेल रहीमतुल्ला - सांगली, हॉटेल नटराज, पुष्पराज चौक -सांगली, हॉटेल रहीमतुल्ला - मिरज, शिरवी मिठाई - सांगली, रघुवीर स्वीट -सांगली, हॉटेल ग्रेट मराठा - सांगली, ए पी बेकरी, मिरज रोड - सांगली, क्रांति भोजनालय, हॉटेल जायका - मिरज, हॉटेल उदय भोजनालय - सांगली, हॉटेल सीझन फोर - सांगली, स्काय ॲव्हेन्यू -सांगली या हॉटेल व रेस्टॉरंटच्या अन्न व औषध प्रशासनाकडून सखोल तपासण्या करण्यात आल्या. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ. अ. पवार, श्रीमती एस. व्ही. हिरेमठ, च. रा. स्वामी व श्री केदार यांनी केली.
हेही पहा ----
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖