झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा देश वाचवा
झाडे हि निसर्गाकडून मानवाला मिळालेली एक अनमोल भेट आहे. झाडाचे संरक्षण करणे ते झाड जोपासणे व त्याला वाढवणे ही आपले कर्तव्य आहे.
तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची आपण कधीच कदर करत नाही. झाडे लावा झाडे जगवा अशी फक्त घोषणाच केली जाते . झाडे ही निसर्गाकडून मानवाला मिळालेले अनमोल भेट आहे. जीवन जगण्यासाठी झाडे एक महत्त्वाचे साधन आहे. झाडे मानवाला ऑक्सिजन ,फळे, फुले, औषधे, सावली, झाड तोडल तर लाकूड आणि जाळलं तर कोळसा अशा अनेक गोष्टी देतो पण मानव त्याची परतफेड झाडे तोडून करतो. झाडे आपल्याला खूप मदत करतात झाडे मातीतील विषारी पदार्थ शोधून घेतात, ऋतू चक्र संतुलित ठेवतात, जमिनीची धूप होऊन देत नाहीत, वातावरणात असलेले दूषित वायू शोषून घेतात, अशी अनेक प्रकारे झाडे आपल्याला मदत करतात.
झाडाचे पर्यावरणीय महत्त्व :
पर्यावरणासाठी झाड खूप महत्त्वाचे आहे झाडे नसती तर जमीन ही पूर्णपणे नापीक झाली असती झाडे असल्यामुळे जमीन सुपीक झाली आहे झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात फुले फळे देतात सावली देतात तरी देखील लोक झाडे तोडतात खूप प्रमाणात प्राणी देखील झाडांवर राहतात त्यांचे घर ते झाडावरच करतात व ते तिथेच राहतात पृथ्वीवरील महत्वाचे नैसर्गिक संसाधन आहे बरेच प्राणी अन्न व निवाऱ्यासाठी झाडाचा उपयोग करतात झाडे लोकांना सरपंच पुरवतात फळे देतात आपल्या देशात खूप ठिकाणी आणखीही गॅसची व लाईटची सोय नसल्यामुळे लोक सरपणासाठी झाडावर अवलंबून असतात काही कारणास्तव लोक झाडे तोडतात झाडे तोडल्यामुळे आपल्या देशाचे खूप नुकसान होत आहे आपल्याला जो लागणार आहे शुद्ध ऑक्सिजनची हवा आपल्याला भेटू शकत नाही शुद्ध ऑक्सिजन न भेटल्यामुळे नाही त्या आजाराला आमंत्रण भेटते प्राण्यांची पक्षांची संख्या देखील खूप कमी प्रमाणात झालेले आहे पूर्ण जंगलातील झाडे तोडल्यामुळे प्राणी जंगलात राहू शकत नाही त्यामुळे प्राण्यांचे देखील प्रमाण खूप कमी झाले आहे काही सणांमध्ये विशेष झाडांचे महत्त्व आहे वटपौर्णिमेसाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते दत्त जयंतीला उंबराच्या झाडाची पूजा केली जाते शैक्षणिकवारी पिंपळाच्या झाडाची खूप लोक पूजा करतात प्रत्येक झाडाचे खूप महत्त्व आहे झाड हे आपल्याला निसर्गाने दिलेले देणगी आहे त्याचा आपण योग्य तो उपयोग केला पाहिजे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖