BANNER

The Janshakti News

बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी उद्या ८ जूलै रोजी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर संजय कांबळे यांचे अमरण उपोषण...


सांगली दि. ७ : आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली, 
श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य, या संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यामार्फत आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संपर्कप्रमुख वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संजय भुपाल कांबळे हे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात उद्या सोमवार दि. ८ जूलै रोजी खऱ्या बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी तसेच मंडळाच्या हितासाठी विविध मागण्या घेऊन... जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत अमरण उपोषण करणार आहेत. अशी माहिती  वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख  संजय भू. कांबळे यांनी दिली आहे.


 
तरी सर्व नोंदणीकृत खऱ्या बांधकाम कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी आणि कल्याणकारी मागण्यांची  प्रशासन व मंडळ, दखल घेण्यासाठी उद्या सोमवार, दिनांक ८ जूलै  रोजी एक दिवस काम बंद करून जिल्हा अधिकारी कार्यालय सांगली येथे उपस्थित राहावे असे आवाहन संजय कांबळे यांनी केले आहे.➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖