BANNER

The Janshakti News

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    

   

     सांगली  दि. 10 (जि.मा.का.) : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य विभागामार्फत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना एस. के. इंटरनॅशनल स्कूल, रेठरेधरण ता . वाळवा आणि डॉफोडील इंग्लिश मेडियम स्कुल, उमदी ता.जत जि. सांगली या निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते 12 वी मोफत शिक्षण देण्यासाठी सन 2024-25 मधील इयत्ता 1 ली ते 5 वी च्या प्रवेशाकरीता सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत विनाशुल्क प्रवेशासाठी संबंधित निवासी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे दि. 30 जूनपर्यंत संपर्क साधून अर्ज सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सांगली कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

             प्रवेशाच्या इयत्ता 1 ली ते  5 वी करीता योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे.  प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजाचा असावा (जात प्रमाणपत्र दाखला सादर करणे आवश्यक), जर विद्यार्थी दारिद्रयरेषेखालील असेल तर त्यासंबंधीच्या यादीतील अनुक्रमांच्या नोंदीसह दाखला आवश्यक, मुलांच्या पालकांच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख रूपये इतकी राहील.

        अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगांव रोड, सांगली यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖







Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖