BANNER

The Janshakti News

शरद जाधव यांना ग्रंथोपासक पुरस्कार जाहीर

 भिलवडी सार्वजनिक वाचनालयाच्या ८४ व्या वर्धापदिनानिमित्त विविध कार्यक्रम

भिलवडी वार्ताहार :             ०८ मे 2024

भिलवडी ता.पलूस येथील सार्वजनिक वाचनाल्याच्या वतीने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार २०२४  व्याख्याते व हास्ययात्राकार शरद जाधव यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे व कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिली.


प्रतिवर्षी वाचनालयाच्या वर्धापनदिनानिमित्त निवड समितीच्या वतीने निवडलेल्या एका सभासदास ग्रंथोपासक पुरस्कार देण्यात येतो.विविध पुस्तकांचे वाचन,वाचन कट्ट्यावरची उपस्थिती,सादरीकरण,स्वतःचे ग्रंथालय,वाचनालयाच्या विविध उपक्रमातील सहभाग,वाचक सभासद व वाचन चळवळ वाढविण्यासाठी राबवित असलेले उपक्रम या सर्व बाबींचा विचार करून शरद जाधव यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह,ग्रंथ भेट असे या पुरस्काराचे स्वरूप असून प्रसिद्ध वक्ते इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते व गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.१२ मे रोजी सायंकाळी ५ वा.पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

भिलवडी सार्वजनिक वाचनालयाच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.शनिवार दि.११ मे रोजी सकाळी १० वा.प्रसाद ग्रंथ वितरण सांगली यांच्या वतीने भव्य ग्रंथप्रदर्शन,सायंकाळी ५ वा.सुप्रसिद्ध साहित्यिक विजय जाधव यांचे विनोदी कथकथन होणार आहे.रविवार दि.१२ मे रोजी सायंकाळी ठीक ५ वा.शिवम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रमुख व ख्यातनाम वक्ते इंद्रजीत देशमुख यांचे पसायदान या विषयांवर व्याख्यान व सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार वितरण समरंभ संपन्न होईल.

सर्व नागरिक व वाचकानी वचनाल्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖