BANNER

The Janshakti News

सांगली : घरफोडी प्रकरणात जप्त केलेला मुद्देमाल भिलवडी पोलिसांनी फिर्यादीस केला परत..

 

                              VIDEO



भिलवडी वार्ताहार :                   10 May 2024

भिलवडी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०५/०४/२०२३ रोजी रात्री दत्तात्रय नारायण देवार्डे रा. चोपडेवाडी (बोरबन ) ता.पलूस जिल्हा सांगली यांच्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून घरात प्रवेश करुन बेडरूम मधील तिजोरीमध्ये ठेवलेले  सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. अशी फिर्याद दत्तात्रय नारायण देवार्डे यांनी दि. ०६/०४/२०२३ रोजी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर भा.द.वि.स.कलम ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.



सदर गुन्हयाच्या तपासाच्या अनुशंगाने पोलीस  तपास करीत असताना भिलवडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या टिमने   दिनांक २५.०७.२०२३ रोजी या गुन्ह्यातील संशयित एका आरोपीला व एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यावेळी त्यांच्या ताब्यात असणारे सदर गुन्ह्यात चोरी केल्याले सोन्याचे दागिने पोलीसांनी हस्तगत केले होते.

आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादिला परत देण्यात यावा असा आदेश माननीय न्यायालयाने भिलवडी पोलीसांना दिला होता.

माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार काल बुधवार दिनांक 9 मे रोजी सोन्याचे एक नेकलेस, सोन्याचे गंठण, सोन्याचा गोप व सोन्याची एक अंगठी असा एकूण 50 ग्रॅम वजनाचे दोन लाख एकोणसत्तर हजार रुपये किंमतीचे दागिने भिलवडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी फिर्यादी दत्तात्रय नारायण देवार्डे यांच्या ताब्यात दिले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖




Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖