BANNER

The Janshakti News

ईव्हीएम मशीनचे 5 एप्रिल रोजी रॅण्डमायझेशन - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


 


सांगली, दि. 2, (जि. मा. का.)  : येत्या 5 एप्रिल रोजी ईव्हीएम मशीनचे रॅण्डमायझेशन (सरमिसळ ) घेतले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज विविध पक्षांच्या प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत दिली.

       यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि ) प्रमोद काळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल उपस्थित होते.    यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत जिल्ह्यातील सुमारे 50 टक्के पोलिंग स्टेशनमध्ये वेब कास्टिंगची सुविधा ठेवणार असल्याचे सांगून मॉक पोल वेळी संबंधित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मतदानादिवशी म्हणजेच 7 मे रोजी मतदान सुरू होण्याच्या पूर्वी किमान दीड तास अगोदर पोलिंग बूथमध्ये उपस्थित राहावे. येत्या 10 एप्रिल रोजी राजकीय पक्षांची पुढील बैठक जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या शंकाचे निरसन प्रशासनातर्फे केले जाईल असेही त्यांनी सांगितले.


यावेळी मतदान प्रक्रिया, उमेदवार खर्च त्याचबरोबर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी करावयाची कारवाई याबाबत श्रीमती स्नेहल कनिचे, आदर्श आचारसंहिता पालनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी तर ऑनलाइन नॉमिनेशनबाबत यासीन पटेल त्याचबरोबर एक खिडकी परवानाबाबत जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆