BANNER

The Janshakti News

अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा

 


   सांगली, दि. 26 (जि. मा. का.) :  भारत निवडणूक आयोगाने अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी पदीय कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल मतदानाची सुविधी उपलब्ध करून दिली आहे. याबाबतची अधिसूचना व नमुना फॉर्म 12 D सांगली जिल्ह्याच्या sangli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी याचा लाभ घेवून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

     अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी पदीय कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल मतदानाची सुविधी उपलब्ध करून दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 19 मार्च 2024 रोजी प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 32 अत्यावश्यक शासकीय सेवेमधील जे अधिकारी, कर्मचाऱी मतदानादिवशी कर्तव्य बजावत असतील त्यांना पोस्टल मतदानाची सुविधा दिली आहे. अत्यावश्यक सेवेमधील आस्थापना पुढीलप्रमाणे - मेट्रो, रेल्वे ट्रान्सपोर्ट (पॅसेंजर आणि Freight) सर्व्हिसेस, ज्या प्रसारमाध्यमांना मतदान दिवसातील प्रक्रिया कव्हर करण्यासाठी आयोगाच्या मान्यतेने अधिकृत पत्रे जारी करण्यात आली आहेत ते प्रसारमाध्यम प्रतिनिधी, इलेक्ट्रीसिटी डिपार्टमेंट, बीएसएनएल, पोस्ट आणि टेलिग्राम, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ, स्टेट मिल्क युनियन ॲण्ड मिल्क कोऑपरेटिव्ह सोसायटी, हेल्थ डिपार्टमेंट, फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ॲव्हीएशन, रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, फायर सर्व्हिसेस, ट्राफिक पोलिस, ॲम्बुलन्स सर्व्हिसेस, शिपींग, फायर फोर्स, जेल, एक्साईज, वॉटर ॲथॉरिटी, ट्रेझरी सर्व्हिसेस, फॉरेस्ट, इन्फॉर्मेशन ॲण्ड पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट, पोलीस, सिव्हील डिफेन्स ॲण्ड होम गार्ड, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार, पॉवर, भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, डिपार्टमेंट ऑफ पीडब्लूडी, एमटीएनएल.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆