=====================================
=====================================
आता हळूहळू उन्हाळा सुरू झाल्याचं जाणवायला लागलं आहे. अशात वातावरण बदलामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ लागतात. या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळी उपाय करतात. असाच एक खास उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक अशी भाजी आहे जी उन्हाळ्यात खाल तर अनेक समस्या दूर होतील. ती म्हणजे ब्रोकली. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर शरीराला वेगवेगळे व्हिटॅमिन्स तर मिळतीलच सोबतच उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासूनही बचाव होतो.
ब्रोकलीचे होणारे फायदे जाणून घेऊ.
ब्रोकलीमधील पोषक तत्त्व :
ब्रोकली ही तशी फ्लॉवरची एक प्रजाती आहे. पण यात आढळणारे पोषक तत्त्व फार खास असतात. ब्रोकलीमध्ये फॅटचं प्रमाण फारच कमी असतं, त्यामुळे या भाजीकडे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर म्हणूनही पाहिलं जातं. ब्रोकलीमध्ये सोडियम, पोटॅशिअम, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, आयर्न आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आढळतात.
वजन कमी करण्यास फायदेशीर :
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशिल आहात, तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ब्रोकलीचा समावेश आवर्जून केला पाहिजे. ब्रोकलीची भाजी खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते पोषक तत्त्व मिळतात. तसेच जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्यापासूनही बचाव होतो.
इम्यूनिटी आणि मेटाबॉलिज्म वाढतं :
जर तुमची इम्यूनिटी कमजोर असेल तर मेटाबॉलिज्म सुद्धा कमजोर होऊ लागतं. ब्रोकलीच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं, याने शरीराची इम्यून सिस्टीम ठीक होते. इम्यून सिस्टीम ठीक असेल तर आपोआप मेटाबॉलिज्म सुद्धा मजबूत राहतं.
अल्झायमर आणि डिमेंशियापासून बचाव :
वाढत्या वयासोबत व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात एक मोठी समस्या म्हणजे स्मरणशक्ती कमजोर होणे. काही लोकांना अल्झायमर आणि डिमेंशियाचा देखील त्रास होऊ लागतो. जर तुम्हाला अल्झायमर किंवा डिमेंशियाच्या समस्येपासून दूर रहायचं असेल तर डाएटमध्ये ब्रोकलीचा समावेश करावा.
उन्हाळ्यात ब्रोकलीची भाजी वरदान :
उन्हाळ्यात सूर्यातून निघणाऱ्या यूवी रेडिएशनने शरीरावर फार वाईट परिणाम होतो. या रेडिएशनमुळे शरीराच्या अंगांवर सूज येऊ लागते. जर तुम्हाला गरमीमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचायचं असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ब्रोकलीचा समावेश करू शकता.
हार्ट अटॅकचा धोकाही होतो कमी :
डेली डाएटमध्ये जर तुम्ही ब्रोकलीची भाजी कशाही प्रकारे खात असाल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोकाही कमी असतो. ब्रोकलीच्या भाजीमध्ये आढळणारे पोषक तत्त्व तुमचं रक्त घट्ट होण्यापासून रोखते. ब्रोकलीमध्ये आढळणारं कॅरेटेनॉयड्स ल्यूटिन आणि पोटॅशिअम कोलेस्ट्रॉलचा स्तरही नियंत्रणात ठेवतात.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
हेही पहा ----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆