BANNER

The Janshakti News

इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूल मध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा...


                                   VIDEO
   

                                 

=====================================
=====================================

भिलवडी वार्ताहर :     दि. 28 फेब्रुवारी 2024

पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूल मध्ये 28 फेब्रुवारी 2024 रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

 थोर वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांनी रमण इफेक्ट हा प्रयोग यशस्वीरित्या 28 फेब्रुवारी 1924 रोजी सादर केला होता. यानिमित्ताने हा दिवस "विज्ञान दिन" म्हणून साजरा केला जातो. 
 
काही विद्यार्थ्यांनी सी. व्ही. रमण यांच्या संशोधनाविषयी तसेच त्यांच्या यशस्वी जीवनाबद्दल विविध माहिती सांगितली. तसेच ३ री ते ९ वी मधील विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाशी संबंधित विविध  नृत्य, गायन  यांचे सादरीकरण केले. तर इयत्ता ४ थी ते ९वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग सादर केले. 


 या प्रयोग प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे संचालक श्री.गिरीश चितळे  यांनी केले. तसेच  वैज्ञानिक रांगोळी  प्रदर्शनही भरवले होते त्याचे उद्घाटन  संस्थेचे सेक्रेटरी श्री.मानसिंग हाके  यांनी केले.

 विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगाचे सादरीकरण पाहण्यासाठी  सेकंडरी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री.विजय तेली यांच्या सह पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उपस्थित सर्वांनीच मुलांचे खूप कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रयोग सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे वैज्ञानिक दृष्टिकोन व गुणांना चालना देणे हा हेतू होता.  यासाठी शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.  
 
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील सिनियर टीचर सौ.किर्ती चोपडे या होत्या. त्यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणातून विविध माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. 



 या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे व शाळेतील सर्व विज्ञान शिक्षक सौ. उज्वला हजारे,  सौ. मंजुषा शिंदे, सौ. अदिती देशपांडे, सौ. अश्विनी महिंद यांचे देखील विशेष मार्गदर्शन लाभले. 
  
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 9 वी तील आर्या पाटील हिने केले व आभार प्रदर्शन 9 वी तील विद्यार्थीनी कु. निधी खोत हीने मानले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆