=====================================
=====================================
कुंडल : वार्ताहर 24 जानेवारी 2024
लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य शिबिराचे उद्धाटन आमदार अरुणअण्णा लाड यांच्याहस्ते कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले.
यावेळी आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, या शिबिरातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचीही तपासणी व्हावी कारण तेही त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचा आधार आहेत. हे शिबिर ठराविक कालावधितच न घेता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची तपासणी व उपचार होण्याच्या उद्देशाने ही शिबिरे सतत सुरू ठेवण्यासाठी लागेल ती मदत ग्रामपंचायत आणि क्रांती कुटुंबाकडून करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आमदार लाड म्हणाले, शरद लाड फाउंडेशनतर्फे नेत्र तपासणी व उपचार, रक्तदान शिबिरे सतत घेतली जात आहेत त्याचा ही फायदा लोकांनी घ्यावे तसेच या शिबिरात गावातील व परिसरारील शाळांतील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांची तपासणी करून घ्यावे यासाठी पालकांनी ही मदत करावी असे आवाहन केले.
यावेळी सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार, सदस्य किरण लाड, राहुल लाड, श्रीकृष्ण लाड, जितेंद्र कारंडे, हणमंत परळे, सोनाली थोरबोले, डॉ.ऐश्वर्या चौगुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार, डॉ. सुशील गोतपगार यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य शिबिरात बोलताना आमदार अरुणअण्णा लाड.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆