======================================
======================================
सांगली : वार्ताहर दि. 6 ऑक्टोबर 2023
सांगली : साांगली , कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलिसांना यश आलं आहे. यामध्ये बंद घराची कुलूपं तोडून सोन्या-चांदीचे दागिने, चोरणाऱ्या एका आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.
या चोरट्यां कडून १५,८२,०१३ रु. किंमतीचे (३०० ग्रॅम) ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ५०, ७२५ रु. किंमतीचे ९५१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने.
व १,६०,०००/- रु.रोख रक्कम त्यामध्ये वेगवेगळया चलणी नोटा असा एकूण
१७, ९२, ७३८ /- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजु माने, वय ३० वर्ष, रा. अनिलनगर, पंढरपुर ता. पंढरपुर जि. सोलापुर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध तासगाव , इस्लामपूर ,आष्टा ,शाहुपुरी(कोल्हापूर) , दापोली(रत्नागिरी) इ. पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करून सदर पथकाला घरफोडी चोरी करणारे अभिलेखावरील गुन्हेगार, जेल रिलीज झालेले गुन्हेगार तसेच संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
त्याप्रमाणे दि.०१/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सांगली हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकामधील पो.ना. अनिल कोळेकर व पो.ना. संदिप नलावडे यांना अभिलेखावरील व सध्या कर्नाटक राज्यातुन जामीनावरती बाहेर असलेला सराईत आरोपी लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजु माने हा सांगली शहरामध्ये संशयितरित्या फिरत असल्याबाबत खास बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कुपवाड येथे छापा मारून त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगली सह कोल्हापुर व रत्नागिरी जिल्हयामध्ये रात्रीच्या वेळी बंद घरे फोडुन चोरी केल्याची कबुली दिली.
त्याप्रमाणे सपोनि पंकज पवार व त्यांच्या पथकाने त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आला आहे. आरोपीकडुन पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान कौशल्यपूर्ण तपास करून सांगली जिल्हयातील ३ कोल्हापुर १ व रत्नागिरी १ अशा गुन्हयांची उकल करून त्यातील चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे , सपोनि पंकज पवार, सपोनि सिकंदर वर्धन, पोफौ कुमार पाटील, सपोफौ अच्युत सुर्यवंशी , पोहेकॉ बिरोबा नरळे, संदीप नलावडे, अनिल कोळेकर, सागर लवटे, संदीप गुरव, नागेश खरात, विक्रम खोत, सागर टिंगरे, दरीबा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, प्रकाश पाटील, पोशि , विक्रम खोत, सोमनाथ गुंडे,अमर नरळे, चापोहेकॉ शिवाजी शिद, गणेश शिंदे. मपोकों वनिता चव्हाण ,ज्योती चव्हाण, पोना / सचीन बागडी, स्वप्नील नायकोडे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.
लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजु माने हा आरोपी सराईत गुन्हेगार असुन तो कर्नाटक राज्यामध्ये घर फोडीच्या गुन्हयामध्ये अटक होता तो दोन महीन्यापुर्वी जामीनावर बाहेर आला असुन सुटून आलेनंतरच्या कालावधीमध्ये त्याने हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात घरफोडीचे बरेच गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपीने सांगली जिल्हयातील तासगाव शहरातील सौ. मिनल अविनाश कुडाळकर यांचे दिनांक ०७/०९/२३ रोजी यांचे बंद घर फोडुन ६,९६,०००/- रू किंमतीचे दागिने , आष्टा शहरातील श्री. सुभाष शंकर कुलकर्णी रा. आष्टा यांचे दिनांक १७/०८/२३ रोजी बंद घर फोडुन ६३,०००/- रू किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने , पेठनाका येथील श्री. दिपक माणीक जाधव रा. पेठनाका यांचे दिनांक ०१/०९/२३ रोजी बंद घर फोडुन २,७०,०००/- रू किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम , कोल्हापुर येथील शायरा शाबुद्दीन मुजावर रा. न्यू शाहुपुरी, कोल्हापुर यांचे दिनांक ०६/०८/२३ रोजी बंद घर फोडुन १,२५,०००/- रू किंमतीचे सोन्या दागिने , रत्नागिरी येथील श्री शेखर गजानन प्रधान रा. दापोली जि. रत्नागिरी यांचे दिनांक १५/०८/२३ रोजी बंद घर फोडुन १,५६,०००/- रू किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल रात्रीचे वेळी बंद घर - फोडुन चोरून नेला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचे मार्गदर्शनाखाली सन २०२३ मध्ये आज अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन पोलीस निरीक्षक सतिश शिंदे व त्यांचे पथकाने सांगली सह परजिल्हयातील मालमत्तेचे एकुण १४७ गुन्हे उघडकीस आणुन एकुण २,६०,१९,४६६ /- रूपये (दोन कोटी साठ लाख एकोणीस हजार चारशे सहासष्ठ रु) किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆