BANNER

The Janshakti News

जुगार अड्यावर छापे ; हजारोंचा मुद्देमाल जप्त ; जत उपविभागीय पोलीस कार्यालयाची कारवाई=====================================
=====================================
जत : वार्ताहर                        दि. 5 ऑक्टोबर 2023

 जत उपविभागीय पोलीस कार्यालयाने जत तालुक्यातील पूर्वभागातील उमदी येथे जुगार अड्ड्यावर धाडसत्र सुरू केले आहे. या छाप्यात तीन जुगार अड्ड्यावर कारवाई करत ९ हजार९१५ रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत उमेश गिरमला हुन्नूर , गुंडाप्पा भीमाना कोळी , अमन आप्पासाहेब नदाफ या तिघा संशयितावर मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस नाईक सुनील व्हनखंडे यांनी उमदी पोलिसात दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुनील व्हनखंडे यांच्या पथकाने केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमदी येथे तीन ते चार जुगार अड्डे सुरू आहेत. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांना मिळाली होती मिळालेल्यानुसार पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी सायंकाळी उमदी बाजार कट्ट्यावरील तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.  जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण ९ हजार ९१५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन तिघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत कसून चौकशी केली असता सदरचे मटके अड्डा बिगर परवाना मालक राजू शिंदे यांच्याकरिता सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. ही कारवाई पोलीस नाईक सुनील व्हनखंडे ,विजय आकुल, संतोष चव्हाण, अजित मदने यांनी केली आहे.
पुढील तपास पोलीस कॉस्टेबल कपिल काळेल हे करत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆