BANNER

The Janshakti News

सोशल मीडियाच्या युगात ई-बुक,ऑडिओ बुक च्या माध्यमातून वाचन चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न करूया - गिरीश चितळे


भिलवडी सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत संपन्न.
 
=====================================
=====================================
 
भिलवडी : वार्ताहर                दि. २५ ऑक्टोबर २०२३

 पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली  खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

  प्रारंभी विश्वस्त जी.जी.पाटील यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून सभेला प्रारंभ करण्यात आला.अहावल सालातील दिवांगताना श्रद्धांजली वाहण्यात आली.कार्यवाह सुभाष कवडे यांनी वाचनालय वाचकांसाठी राबवित असलेले सर्व उपक्रम,विविध  योजनांचा सविस्तर आढावा घेतला.चालू वर्षात राबविणार असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 
जयंत केळकर यांनी गेल्या आर्थिक वर्षातील अहवालाचे वाचन केले.ऑडिटर ची नेमणूक करणे,चालू वर्षातील आर्थिक तरतुदी विषयी माहिती सांगितली.

गिरीश चितळे यांनी सोशल मीडियाच्या युगातही भिलवडी वाचनालयाने वाचन चळवळ टिकवून ठेवण्यात सातत्य कायम स्वरुपी टिकवून ठेवण्यात यश मिळविले असल्याचे सांगितले.सोशल मीडियावर देखील ई बुक, ऑडिओ बुकच्या माध्यमातून वाचन चळवळ गती घेत आहे.या माध्यमातून युवावाचक वर्ग 
वाचनाकडे वळविण्यासाठी भविष्यात प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे आवाहन केले.

यावेळी आयोजित चर्चेत भू.ना.मगदूम, डी.आर.कदम,हकीम तांबोळी,उत्तम मोकाशी, शरद जाधव यांनी भाग घेतला.सुयश निकम,अमेय नलवडे यांनी केलेल्या संस्कारक्षम कथा संकलन पुस्तिकेचे गिरीश चितळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. नाट्य परिषदेच पुरस्कार प्राप्त साहित्यिक महेश कराडकर यांचा गिरीश चितळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विश्वस्त जी.जी.पाटील,रघुनाथ देसाई,
डॉ.भालचंद्र कुलकर्णी,ए.के.चौगुले, डॉ.जयकुमार चोपडे, ह. रा.जोशी, प्रदीप शेटे,अशोक साठे,हणमंत डिसले,
महादेव जोशी, ग्रंथपाल वामन काटीकर आदींसह वाचक सभासद  उपस्थित होते.


 गिरीश चितळे यांच्या हस्ते सुयश निकम,अमेय नलवडे यांच्या कथा संकलन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी सुभाष कवडे,डॉ.भालचंद्र कुलकर्णी,रघुनाथ देसाई,जी.जी.पाटील आदी मान्यवर.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆