BANNER

The Janshakti News

18 ऑक्टोबरला सन्मान शैक्षणिक संकुल माळवाडी येथे विविध स्पर्धांचे आयोजन




======================================
======================================

भिलवडी :     दि. 17 ऑक्टोबर 2023
(कार्यकारी संपादक - सचिन टकले)

पलूस तालुक्यातील  सन्मान शिक्षण संस्था, सुखवाडी या संस्थेचे मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते कै. ह. भ. प. सुबरावबापू यादव यांच्या २१ व्या  स्मृतीदिनानिमित्त सन्मान शैक्षणिक संकुल, माळवाडी, ता. पलूस, जि. सांगली येथे १८ ऑक्टोबर रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून १९ ऑक्टोबर रोजी विजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे,

यामध्ये रंगभरण, रांगोळी, विविध बौध्दीक व क्रीडा स्पर्धा यांचा समावेश आहे.

स्पर्धांचे आयोजन करताना नावीन्यपूर्ण व चिंतनशील विषय निवडण्यात आले आहेत. स्पर्धेकांना चौफेर विचार करायला लावणाऱ्या या स्पर्धा आहेत.
  
     सहभागी शाळा --

आयोजित सर्व स्पर्धेसाठी सन्मान शिक्षण संस्था, सुखवाडी या संस्थेच्या अंतर्गत पलूस तालुक्यातील
सन्मान करिअर अकॅडमी माळवाडी ,
संजय यादव इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज माळवाडी , संत ज्ञानेश्वर विद्यालय वसगडे , आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे , संस्कार विद्यालय नांद्रे , श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालय पलूस , सन्मान पब्लिक स्कूल माळवाडी , आदर्श बालकमंदिर प्राथमिक शाळा माळवाडी या शाळा सहभागी होणार आहेत.

   प्रमुख पाहुणे ----

बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सांगली जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख , पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने , भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र चौगुले , मा. सरपंच विजयकुमार चोपडे , यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

   विशेष सत्कार --

अक्षय आप्पासो यादव , सचिन पाटील , अश्विनी बनसोडे , स्वप्नगंधा सागर बाबर , प्रवीण राजेंद्र गुरव , कस्तुरी उमेश पाटील , विशाल अरुण नलवडे  यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संजय यादव सर यांनी दिली आहे.

       कै. ह. भ. प. सुबरावबापू यादव यांंचा २१ वा  स्मृतीदिन 




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆