======================================
कुंडल : वार्ताहर दि. ०३ ऑगस्ट २०२३
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना देशातील एक आदर्श कारखाना आहे, त्यामुळे कारखान्याची राष्ट्रीय स्थरावर वेगळी ओळख असल्याने या कारखान्याचे भविष्य उज्वल असल्याचे प्रतिपादन एनसिडीसी नवी दिल्लीचे शुगर डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री यांनी केले.
ते कुंडल (ता.पलूस) येथे क्रांती कारखान्यावरती सदिच्छ भेट देण्यासाठी आले असताना बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते.
अग्निहोत्री म्हणाले, क्रांती कारखाना उक्तृष्ठरित्या सुरू आहे, राष्ट्रीय सहकारी विकास निगमने या कारखान्याला आजवर जेवढी मदत केली ती पुढे ही होईल कारण आपले देश पातळीवरील स्थान चांगले आहे.
भविष्यात जागतिक स्थरावर साखरेला चांगले दिवस येणार आहेत आणि भारत हा एकमेव देश साखर उत्पादनात अग्रेसर असेल. म्हणून इथेनॉलचे उत्पादन करा पण साखरेचे उत्पादन ही तुलनेने असावे. कारखान्याने उत्पादनाच्या 20 टक्के पर्यंतच इथेनॉल निर्मिती करावी असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी कारखान्याचे संचालक, कर्मचारी उपस्थित होते.
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी एनसिडीसी, नवी दिल्लीचे शुगर डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री यांचा सत्कार केला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆